Zero Income Tax only for Employee ? see here details of Budget 2025-2026
Zero Income Tax-नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत १२ लाखापर्यंत Zero टॅक्स खरंच आहे का ? आहे तर कसा , त्याचा फायदा कुणाला होणार , कुणाला त्याचा फायदा नाही , १२ लाख पर्यंत झिरो टॅक्स चा लाभ कसा मिळेल . ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हला आम्ही देणार आहोत ते ही अगदी सोप्या भाषेत , चला तर समजून घेऊयात New TAX REGIME 2025 .
१ फेब्रुवारी २०२५ ला केंद्रीय अर्थ मंत्री श्री . निर्मला सीतारामन यांनी संसदेत वर्ष २०२५ -२०२६ साठी चे बजेट जाहीर केले , त्या मध्ये त्यांनी १२००००० म्हणजेच १२ लक्ष पर्यंत Zero टॅक्स द्यावा लागेल म्हणजेच टॅक्स भरावा लागणार नाही अशी घोषणा केली ते कसे ते आता आपण समजून घेणार आहोत
बजेट २०२५ नुसार ज्यांचे उत्पन्न १२ लक्ष असलेले कर्मचारी तसेच व्यवसायिक याना आता टॅक्स म्हणजेच इनकम टॅक्स हा भरावा लागणार नाहीये , तसेच जे कर्मचारी म्हणजेच सरकारी , निम सरकारी , केंद्रीय कर्मचारी ,तसेच खाजगी कंपनीमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आहेत त्यांना १२७५००० पर्यंत कर लागणार नाही कारण त्यांना स्टॅंडर्ड डिडक्शन नुसार आणखी ७५००० हजाराची सूट दिली आहे .
परुंतु जेव्हा आपण पाहतो इनकम टॅक्स स्लॅब २०२५-२०२६ साठी त्यात ४ ते ८ लाख ला ५ टक्के तर ८ ते १२ लाख ला १० टक्के टॅक्स दाखवत आहे बरोबर न तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो कि केंद्र सरकारने TAX REBATE च्या अंतर्गत म्हणजेच सेकशन 87A मध्ये २५००० वरून ६०००० एवढे वाढवले त्यामुळे वर दाखवलेल्या कॅल्कुलशन नुसार जो ६०००० टॅक्स तुम्हला लागणार होता १२ लाख रकमेवर तो लागणार नाही , थोडक्यात ६०००० टॅक्स सूट केंद्र सरकारने सेकशन 87A नुसार दिली आहे . म्हणजेच सर्व व्यवसायिकांना १२ लाख तर कर्मचारी वर्गाला १२.७५ लाख पर्यंत Zero टॅक्स लागणार आहे .
तसेच महत्वाचे म्हणजे लॉन्ग टर्म कॅपिटल गेन तसेच शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजेच शेअर मार्केट , प्लॉट्स , FD इत्यादी वरून झालेल्या इनकम वर वर दाखवलेल्या स्लॅब नुसार सर्व कर लागणार आहे .
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .