Parbahni MH22-What are the best places to visit in Parbhani ?परभणी विषयी माहिती

परभणी विषयी माहिती -What are the best places to visit in Parbhani

What are the best places to visit in Parbhani-आज आपण पाहणार आहोत महाराष्टातील अश्या एका शहराविषयी माहिती जी बहुसंख्य लोकांना आता पर्यंत माहित च नाहीये , मित्रानो महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस केवळ २६ जिल्हे महाराष्ट्रात होते त्यात होते आपले परभणी. परभणी विषयी जास्त लोकांना फार काही माहिती नाहीये चला तर मग जाणून घेऊया MH22 ने प्रसिद्ध असलेल्या परभणी विषयी माहिती .

 

इतिहास –

परभणी शहराचा इतिहास हा १६ व्या शतकापासून मिळतो , परभणीला अगोदर प्रभावती नगर म्हणून ओळखले जायचे , सध्याचा परभणीच्या भाग अगोदर मुघल साम्राज्यच्या पाथरी व वाशीम प्रादेशिक प्रदेशात विभागला होता , हा प्रदेश इसवीसन १७२४ पर्यंत मुघलात होता नंतर कासारखेडा येथे झालेल्या मुघल व निझाम यांच्या युद्धानंतर हा भाग निझाम नि काबीज केला व तेव्हा पासून १७ सेप्टम्बर १९४८ पर्यंत हा निजामशाही मध्ये येत होता .

 

प्रादेशिक व भोगोलिक माहिती –

What are the best places to visit in Parbhani

परभणी हा महाराष्ट्र राज्यातील छ. संभाजी नगर प्रादेशिक भागात मोडत असून , नांदेड हिंगोली, बीड व जालना ह्या जिल्ह्याच्या शेजारी आहे . सध्या परभणी जिल्यात एकूण ९ तालुके आहेत . पूर्णा ,जिंतूर ,पाथरी ,गंगाखेड ,सोनपेठ , मानवत, सेलू ,पालम व परभणी हे तालुके आहेत .१ मे १९९९ पर्यंत हिंगोली व वसमत देखील परभणी जिल्ह्यात होते , १९९९ ला परभणी जिल्ह्यची विभागणी होऊन नवीन हिंगोली जिल्ह्यची निर्मिती झाली .
सध्या परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफ़ळ हे ६५१७ चौ. किमी असून हा छ. संभाजी नगर प्रादेशिक विभागातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे .

What are the best places to visit in Parbhani ?-परभणी तील भेट देण्यासाठी काही विशेष ठिकाण

१)दत्तधाम मंदिर-

हे परभणीतील म्हणजेच शहरातील वसमत रोड वर असून येथे अतिशय सुंदर व मनमोहक भगवान दत्तात्रयाचे मंदिर आहे. या मंदिरात गेल्यावर आंतरिक शेतात मिळते असे मानले जाते. परभणी बस स्टॅन्ड पासून ४ किमी अंतरावर आहे .

 

२)मुडगळेश्वर मंदिर-

हे अत्यन्त प्राचीन मंदिर मुद्गुल गावात असून हे गोदावरी नदीच्या तीरावर असून हे मंदिर दगडाच्या शिलात कोरलेले आहे , हे मंदिर परभणी शहरापासून ४५ किमी अंतरावर आहे.

 

३) येलदरी धारण (Yeldari dam )-

येलदरी धरण हे परभणी जिल्यातील जिंतूर तालुक्यात आहे , ह्या धरणाची स्थापना १९६८ ला झाली असून हे मराठवाड्यतील दुसरे सर्वात मोठे धारण आहे . तसेच येथे महाजनको (MAHAGENCO)म्हणजेच शासकीय जलविद्युत केंद्र आहे . ह्या मुले परभणी तसेच हिंगोली जिल्याची विजेचा प्रश्न मिटला आहे .
या परिसरात लोक हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी दूर वरून येतात .

 

४)गंगाखेड संत जनाबाई चे जन्म गाव –

temple

परभणी जिल्ह्यात वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध असलेल्या संत जनाबाई यांचे जन्मगाव असलेले गंगाखेड सुद्धा परभणी मध्ये आहे येथे संत जनाबाई यांचे मंदिर असून या ठिकाणी भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून येतात .

 

५)चारठाणा प्राचीन मंदिरयांचा संघ-

जिंतूर तालुक्यातील चारठाणा हे गाव अतिशय प्रचलित असून ,हे गाव येथे असलेल्या ३०० पेक्षा जास्त प्राचीन मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.येथे जवळपास सर्व हिंदू देवतांचे मंदिर आहेत .येथील काही मंदिरे भुयारात आहेत म्हणजेच जमिनीपासून खाली आहेत हे येथील एक विशेष बाब आहे .

 

६ )हजरत तुराबुल हक दर्गाह –

सुफी संत तुराबुल हक काद्री यांच्या मुळे पावन असलेल्या हजरत तुराबुल हक दर्गाह हे संपूर्ण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे अशी दर्गाह असून येथे सर्व धर्माच्या भक्त वर्ग प्रत्येक वर्षी भरल्या जाणाऱ्या उरुसाला जाऊन आपल्या इछा तुराबुल हक बाबा ला सांगतात व त्या पूर्ण होतात असे या जाते, येथे आल्यावर अत्यन्त शांत व प्रसन्न वाटते . येथील उरूस हा प्रत्येक वर्षी फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यात भरतो .
हि दर्गाह परभणी शहरापासून केवळ ५ किमी अंतरावर आहे येथेयेण्यासाठी पुष्कळ ऑटो रिक्षा मिळतात व अत्यन्त मुबलक दारात येथे येता येते .

 

७) श्री मृत्युन्जय पारडेश्वर मंदिर-

भारतातील सर्वात वजनी व मोठा शिवलिंग असलेल्या मृत्युन्जय पारडेश्वर हे परभणी मध्ये असून परभणीच्या बुस्टन्ड पासून केवळ ४ किमी अंतरावर आहे , येथील शिवलिंग हे २५० किलो ग्राम वजनाचं आहे हे येथील विशेष .

 

८) साई बाबा मंदिर पाथरी-

पाथरी येथी श्री साई बाबा मंदिर हे अतिशय प्रसिद्ध मंदिर असून येथे संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात भक्त येतात , असे मानतात कि पाथरी हे श्री साई बाबा यांचे जन्म गाव आहे .

 

शिक्षण –

परभणी हे शिक्षणासाठी नावाजलेलं शहर असून येथील गांधी विद्यालय हाय स्कुल , बाल विद्या मंदिर ह्या खूप जुन्या व चंगळ निकाल असलेल्या शाळा आहेत .
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ परभणी हे विदयापीठ मराठवाड्यतील अत्यन्त महत्वाचे व शेती साठी उपयुक्त असून येथे हजारो विद्यर्थी शिक्षण घेतात .

 

इतर माहिती –

road

परभणी शहराला रास्ता तसेच रेल्वे ने हि येता येते , येथे नांदेड रेल्वे विभागातील परभणी जंकशन आहे .
परभणी रेल्वे स्टेशन वरून नांदेड हैद्राबाद , छ. संभाजी नगर , मनमाड , लातूर रोड इत्यादी शहराला जाता येते .
परभणी हे पुण्यापासून ३८८ किमी अंतरावर आहे , लातूर पासून १२७ किमी ,हिंगोली पासून ७५ किमी तसेच नांदेड पासून ७४ किमी अंतरावर आहे.

तुम्हाला What are the best places to visit in Parbhani हि माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर माहिती नक्की पहा धन्यवाद .

Leave a Comment