Ujjain Mahakaleshwar Jyotirlinga Temple-Mahakal Temple उज्जैन महाकालेश्वर रहस्य!

Shri Mahakaleshwar Jyotirlinga-उज्जैन महाकाळेश्वराचे हे रहस्य तुम्हाला माहिती आहेत का ?

 

Ujjain Mahakaleshwar-नमस्कार मित्रानो आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत मध्य प्रदेश मध्ये असलेल्या २ ज्योतिर्लिंगा पैकी १ असलेल्या उज्जैन च्या महाकालेश्वर मंदिरा बद्दल. येथे महाकालेश्वर बद्दल अनेक कथा व रहस्य सांगितले जातात , चला तर मग आपण जाणून घेऊयात उज्जैन च्या महाकालेश्वर बद्दल सविस्तर माहिती .
महाकालेश्वर म्हणजेच महाकाल हे वेळेचे स्वामी असल्यामुळे ते वेळेचा विनाशही करू शकतात म्हणजेच काळाच्या ओघातून मुक्तता मिळण्यासाठी म्हणजेच मोक्ष मिळवण्यासाठी महाकालेश्वर खूप प्रसिद्ध आहे व भक्त येथे येतात .महाकाल म्हणजेच महाकालेश्वर मंदिर हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगं पैकि एक असून येथे भगवान शंकराच्या उग्र रूपात पूजा केली जाते व म्हणूनच येथील भस्म आरती खूप प्रसिद्ध आहे .
हे एक स्वयंभू मंदिर आहे असे मानतात म्हणजेच ते सर्वात अगोदर हे मंदिर कोणत्याही मानवाने स्थापन केलेले नसून स्वतः भगवान शिव येथे विराजमान झाले आहेत .

 

इतिहास-

आजचे उज्जैन हे पूर्वी अवंतिका नगरी म्हणून प्रचलित होती ,पौराणिक शिवपुराण तसेच अनेक प्राचीन ग्रंथा नुसार येथे दूषण नावाच्या राक्षसाचा काळ थाम्बवण्यासाठी एका ब्राम्हणाला भगवान शंकर पावन होऊन महाकालेश्वर च्या रूपात आले , आणि येथेच सगळयांच्या रक्षणासाठी थाम्बण्याचा ब्राम्हणाच्या आग्रहामुळे भगवान शंकर येथे महाकालेश्वर च्या रूपात स्थायिक झाले .
येथील सर्वात पहिला इतिहासातील उल्लेख हा ४ ते ५ व्य शतकात कालिदास यांनी त्याच्या मेघदूत या ग्रंथात केला आहे म्हणजे हे मंदिर त्याच्या हि पूर्वी अस्तित्वात होते असे मानतात कि मंदिर हे गुप्त साम्राज्यच्या काळात म्हणजेच इसवी सण ३०० ते ६०० च्या दरम्यान बांधले गेले नंतर ह्या मंदिराचे जीर्णोद्धार परमार साम्राज्याच्या कालखंडात म्हणजेच ९ व्य ते १२ व्य शतकात झाला ,त्या नंतर १७ व्य शतकात म्हणजेच १७३० च्या सुमारास राणोजी शिंदे यांनी याचा परत एकदा जीर्णोद्धार केला .
१९८० मध्ये मध्य प्रदेश गव्हर्मेंट ने नूतनीकरण केले व त्या नंतर २०२२ मध्ये महाकाल लोक कॉरिडॉर नुसार ह्या मंदिर च्या बाजूस असलेल्या सुमारे ८५० मीटर लांब जागेचे सुंदर असे नूतनीकरण केले .

 

मंदिर रचना-

ह्या भव्य मंदिराचे तीन प्रमुख भाग मानले जातात
१)सगळ्यत खालच्या भागात महाकालेश्वर शिवलिंग आहे
२) मधल्या भागात ओंकारेश्वर आहेत
३)सर्वात वरच्या भागात नाग चंद्रेश्वर शिवलिंग आहे व ते नाग पंचमीला भक्तांच्या दर्शनासाठी उघडे केले जाते.
१२ ज्योतिर्लिंगा मधील हे एकमेव असे मंदिर आहे कि जे दक्षिण मुखी आहे .

 

महाकालेश्वर मंदिराचे काही रहस्य व कथा

१)असे मानतात कि हे महाकाल हे काळ देवता आसल्यामुळे पूर्वीच्या काळी संपूर्ण जगाची प्रमाण वेळ येथूनच ठरवली जात होती .
२)असे मानतात कि महाकालेश्वर हे उज्जैनचे राजा असून येथे कोणताही दुसरा राजा , किंवा प्रधान होऊ शकत नाही त्या मुळेच येथे कुठलीही मोठी व्यक्ती राजा किंवा पुढारी ,नेते मुक्कामी राहत नाहीत .
३) असे मानतात कि येथे येणाऱ्या भक्ताला मोक्ष प्राप्ती होते व त्याचे काळाचे चक्र थांबते .

 

उज्जैन महाकालेश्वर आरतीच्या वेळा व त्याची नावे

shiv

१) भस्म आरती – सकाळी ४ ते ६ वाजता
२) दद्योदक आरती -सकाळी ७.३० ते ८ वाजता
३)भोग आरती -सकाळी 10.३० ते ११ वाजता
४)संध्या आरती – सायंकाळी ५.३० ते ६ वाजता
५)श्री महाकाल आरती -सायंकाळी 7.३० ते 8 वाजता
६)शयन आरती -रात्री १०.३० ते ११ वाजता

सूचना – वरील आरती पैकी भस्म व शयन आरती सोडून इतर आरतीच्या वेळा ह्या मार्च ते ओक्टोम्बर महिण्यामंध्ये ३० मिनिटे अगोदर होतात .

 

येथे कसे यावे-

विमान –
विमानाने येण्यासाठी येथून सर्वात जवळचे विमानतळ म्हणजेच Airport हे देवी अहिल्या बाई होळकर एअरपोर्ट उज्जैन पासून ५५ किमी च्या अंतरावर असून येथे पुणे ,नागपूर , मुंबई येथून फ्लईट्स मिळतात .

रेल्वे -२ किमी मंदिर पासून दूर
उज्जैन येथे रेल्वे चे जंकशन असून येथे महाराष्ट्रातून नागपूर , बडनेरा , अकोला व मुंबई वरून रेल्वे गाड्या मिळतात .

रोड -उज्जैन बस स्थानक पासून महाकालेश्वर मंदिर हे २.५ किमी अंतरावर आहे

road
उज्जैन ला रोड नि येण्यासाठी महाराष्ट्रातून, लातूर , नांदेड , अमरावती , नागपूर वरून इंदोरे पर्यंत भरपूर खाजगी बस म्हणजेच ट्रॅव्हल्स येतात व तेथून उज्जैन हे केवळ ५५ किमी अंतरावर असून येथे येण्यासाठी अगदी मुबलक दारात बसेस मिळतात .

तुम्हाला आमची हे माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर धार्मिक स्थळांची माहिती नक्की वाचा धन्यवाद.

Leave a Comment