तुळजापूर तुळजा भवानी मंदिर , येथे काय पाहावे , कसे यावे , येथे आजूबाजूला कुठे भेट द्यावी , जवळचे रेल्वे स्टेशन आणि tuljapur bhavani temple accommodation
tuljapur bhavani temple accommodation-आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशातील धाराशिव जिल्यातील तुळजापूर शहराची माहिती हे शहर का प्रसिद्ध आहे ? काय काय आहे येथे भेट देण्यासाठी व सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आल्यावर कुठे राहावं , येथे कस यावं इत्यादी प्रश्नांची सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत .
तुळजापूर का प्रसिद्ध आहे ?
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत व भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेले पवित्र पीठ म्हणजेच तुळजा भवानी व तुळजा भवानी मंदिर .
तुळजापूर हे तुळजा भवानी देवीच्या मंदिरामुळे संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे . येथील देवी तुळजा भवानीचे मंदिर जवळपास ८०० वर्ष पूर्वी बांधले गेले असून हे मंदिर अत्यंत भव्य व सुंदर असे शिल्पा मध्ये बांधले आहे . मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्तांना दगडाच्या जुन्या पायऱ्या उतरून कल्लोळ तीर्थ या पाण्याच्या कुंडामधून मंदिराच्या प्रांगणात यावे लागते व नंतर भैरवाचे दर्शन घेऊन च देवीच्या मुख्य मंदिरात जाऊन दर्शन घावे असे या भागात अनेक ग्रामस्त कडून सांगितले जाते .
या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी दररोज भक्त महाराष्ट्र , तेलंगणा , कर्नाटक , आंध्रप्रदेश , गुजरात इत्यादी राज्यातून येतात .
नवं विवाहित जोडपे लग्न झाल्यावर देवीच्या दर्शनाला आवर्जून येतात , हे या भागातील एक प्रकारची परंपरा च आहे.
तुळजापूर ला येऊन देवीचे दर्शन घेतल्यावर खूप मनाला प्रसन्न व शांतता वाटते हे नक्की आहे . तुम्ही अजून आला नसाल तर एकदा येथे नक्की या आणि आपला अनुभव आम्हला नक्की कळवा .
तुळजापूरला आल्यावर येथे कुठे राहावे ?
तुळजापूर ला आल्यास तुम्हला राहण्यासाठी अनेक पर्याय आहेत येथे तुम्ही ५०० रुपये प्रति दिवस पासून पुढे अनेक राहण्यासाठी ठिकाणे आहेत त्याची माहिती पाहुयात
१)भक्ती निवास १०८ तुळजापूर -(bhakta niwas 108 tuljapur)
हे भक्तीनिवास तुळजा भवानी संस्थानाने बांधलेले भव्य , स्वच्छ तसेच सर्व सेवा सुविधांनी परिपूर्ण असे भक्तांसाठी राहण्यासाठी असलेले ठिकाण आहे .
येथे एकूण १४४ पेक्षा जास्त रूम आहेत , ह्या रूम एका व्यक्तीला तसेच कुटुंबाला सुद्धा मिळतात .येथे १ व्यक्तीपासून ते २० व्यक्तींना राहण्यासाठी रूम मिळतात .
येथील रूम चे प्रकार
१)वातानुकूलित रूम (AC room)
२)बिगर वातानुकूलित रूम( non AC room)
३)एका व्यक्तीसाठी रूम
४)१३ व्यक्तीसाठी रूम
५)२० व्यक्तीसाठी रूम
तसेच येथे डिलक्स ,सूट इत्यादी प्रकारच्या रूम्स भक्तांसाठी मिळतात , ह्याची बुकिंग तुम्ही फोने करून सुद्धा करू शकता .
हे भक्ती निवास देवीच्या मंदिरापासून अगदी जवळ म्हणजेच ७०० ते ८०० मीटर अंतरावर आहे येथे तुम्ही पायी सुद्धा जाऊ शकता . अधिक माहिती साठी कृपया भक्तीनिवास च्या संकेत स्थळावर भेट द्या .
२)भवानी छत्र यात्री निवास-
हे हॉटेल देवीच्या मंदिराच्या अगदी जवळ असून येथे जेवणाची व नाश्ता करण्याची सुद्धा सुविधा आहे .
हे हॉटेल देवीच्या मंदिरापासून ३०० मीटर पेक्षा कमी अंतरावर आहे तसेच येथून बस स्टॅन्ड सुद्धा जवळच आहे .
३)पावनदुर्ग लॉज-
हे लॉज तुळजाभवानी मंदिराच्या अगदी जवळ असून येथे राहिल्यास तुम्ही मंदिरात अगदी ५ मिनिटं मध्ये पोहचू शकता . तसेच येथून बस स्टॅन्ड सुद्धा खूप जवळ आहे .
४)आंबाई एक्सएक्युटीव्ह लॉज-
हे अत्यंत सुंदर भव्य व स्वच्छ असे भक्तांना राहण्यासाठी सर्व सुविधा असलेले ठिकाण असून , येथे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत अगदी आपल्या घरी राहिल्या सारखं राहू शकता .
हे लॉज मंदिरापासून १ किमी अंतरावर आहे . तसेच हे १०८ भक्तीनिवासाच्या अगदी शेजारी आहे .
५)हॉटेल दर्शन एक्सेक्युटीव्ह-
हे एक अत्यन्त आलिशान व सर्व सुविधा असलेले राहण्यासाठी एकादी उत्तम असे हॉटेल असून येथे AC नॉन AC रूम खूप चांगल्या मिळतात .
तसेच हे हॉटेल मंदिरापासून अगदी ५०० मीटर वर आहे , तसेच येथे आजूबाजूला जेवणासाठी तसेच खरेदी साठी सर्व मार्केट अगदी जवळ आहे .
या वरील राहण्यासाठी असलेल्या हॉटेल आणि भक्तीनिवास व्यतिरिक्त अनेक हॉटेल व होम स्टे तुळजापूर मध्ये आहेत . आम्ही आपल्याला असे सांगू शकतो कि येथे राहण्यासाठी कमीत कमी ३०० ते ५०० पासून २००० हजार पर्यंत सर्व सुविधा असलेले अनेक हॉटेल मिळतात , तसेच आपण हॉटेल्स ला थेट भेट देऊन येथील दर सुद्धा कमी करू शकता .
तुळजापूर मध्ये काय खावे ?
तुळजापूर ला आल्यावर नाष्ट्या मध्ये येथील डोसा , इडली नक्की खायला पाहिजे , आम्हला विश्वास आहे कि तुम्ही एवढा स्वादिष्ट डोसा तसेच इडली व त्या सोबत येथे देणारी चटणी कुठेच खाल्ली नसणार, तसेच दक्षिण भारतातील डोसा पेक्षा वेगळा व चविष्ट असा डोसा येथे मिळतो .
तसेच जेवण करायचे झाल्यास येथील लोकल थाळी खायला हवी येथे भाकरी ठेचा , गावरान भाज्यांची चव नक्कीच तुम्हला आवडेल .
तुळजापूरच्या आजूबाजूला कुठे कुठे भेट द्यावी ?
तुळजापूर ला देवीचे दर्शन घेतल्यावर तुम्ही ५० ते ६० किमी अंतरावर भेट देण्यासाठी असलेल्या काही ठिकाणाची माहिती पाहुयात .
१) औसा किल्ला –
हा अत्यन्त प्राचीन व सुंदर असा किल्ला औसा येथे असून ही किल्ला तुम्ही तुमच्या मित्रां सोबत तसेच कुटुंब सोबत भेट देऊ शकता . हा किल्ला तुळजापूर पासून केवळ५७ किमी अंतरावर असून येथे येण्यासाठी ४५ मिनिटे लागतात .
२)येडशी अभयारण्य व रामलिंग मंदिर
हे ठिकाण अत्यन्त सुंदर असून येथे दाट झाडी , पक्षांची किलबिलाट तसेच एक प्राचीन शिव मंदिर असून या ठिकाणाला रामलिंग असे म्हणतात कारण येथे भगवान राम येथे येऊन काही दिवस राहिले असे येथे म्हटले जाते .
हे ठिकाण तुळजापूर पासून ४३ किमी अंतरावर आहे व येथे येण्यासाठी ३५ ते४० मिनिटे एवढा वेळ लागतो .
तुळजापूर ला कसे व कशाने यावे ?
तुळजापूर रोड ची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे परंतु आपल्या रेल्वे ने येथे यायचे असल्यास सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे धाराशिव रेल्वे स्टेशन ३० किमी अंतरावर आहे व येथे पुण्यावरून रोज रात्री ७.३० ला नांदेड पनवेल हे एक ट्रेन रात्री १२.१५ पर्यंत धाराशिव ला पोहचते तसेच दिवसाचा प्रवास करण्यासाठी पुणे स्टेशन वरून हरंगुळ लातूर हि ट्रेन सकाळी ६.१० निघते व १०.३० पर्यंत धाराशिव ला पोहचते .
व धाराशिव वरून तुळजापूर जाण्यासाठी MSRTC म्हणजेच ST महामंडळाच्या बसेस १५ मिनिटाला तुळजापूर साठी सुटतात . व येथून तुळजापूर ला येण्यासाठी केवळ ३० मिनिटे लागतात .
जर तुम्हाला दुसरं एक जवळील रेल्वे स्टेशन सांगायचे झाले तर ते म्हणजे सोलापूर रेल्वे स्टेशन हे तुळजापूर वरून ४६ किमी च्या अंतरावर आहे , या रेल्वे स्टेशन वर संपूर्ण भारतातून ट्रेन येतात , व येथे अनेक ट्रेन ह्या पुणे , मुंबई , हैदराबाद ,चेन्नई इत्यादी ठिकाणावरून येतात .म्हणून आपण सोलापूर वरून सुद्धा तुळजापूर ला ४५ मिनिट मध्ये बसेस ने येऊ शकतो .
पुणे ते तुळजापूर हे अंतर २९५ किमी एवढे असून कार ने ५ तास लागतात तर बस ने अंदाजे ७ तास लागतात .