Prayagraj Kumbhamela- कुंभमेळा साठी विशेष ट्रेन व कुंभमेळा विषयी माहिती
खुशखबर ! कारण आता आपले सगळ्यांचे या वर्षी भरलेल्या भारतातील सर्वात मोठ्या पवित्र अश्या कुंभमेळ्याला म्हणजेच महाकुंभमेळ्याला जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने ज्यादा रेल्वे गाड्या सोडल्या आहेत , या वर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्याला भक्तांच्या सोयी साठी ज्यादा रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत .
त्या पूर्वी कुंभमेळयविषयी थोडी माहिती पाहू-
हा भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा मेळा असून ह्यात करोडो हिंदू आपले मन व शरीर साफ करण्यासाठी पवित्र नादीत स्नान करतात .
आता पर्यंत अनेक कुंभमेळे भारताच्या पवित्र भूमीवर झालेत ,ह्या कुंभमेळयला संपूर्ण भारतातून लाखो च्या संख्येत भाविक सामील होऊन आपला मन व शरीर ,धुण्याचा भावनेने येतात .
महाकुंभमेळा हा प्रत्येक १२ वर्ष्यानी होतो , हा कुंभमेळा भारताच्या ४ शहरात हजारो वर्षपासून होत आला आहे आणि तो सध्या स्तितीत सुद्धा प्रत्येक १२ वर्ष्या नंतर प्रयागराज ,नाशिक ,उज्जैन ,हरिद्वार या शहरात भरतो .या कुंभ मेल्याची दाखल युनेस्को ने सुद्धा घेतली आहे .हा असा प्रचंड मोठा मेळा असून ह्याचा इतिहास फार प्राचीन आहे असे मानतात पहिला कुंभ मेळा हा २००० हजार वर्ष्या पूर्वी पहिल्यन्दा भरला आणि तेव्हा पासून आज पर्यंत हा दर १२ वर्ष्यानी भरतो .
चलातर जाणून घेऊयात ह्या ज्यादा रेलगाड्या कुठून सुटणार तसेच भक्तांना कश्या उपलब्ध होणार आहेत
१)नांदेड -पटणा रेलगाडी क्रमांक -०७७२१
हि गाडी २२ जानेवारी २०२५ ला नांदेड जंकशन वरून रात्री ११ वाजता सुटेल व हि गाडी पूर्णा , बसमत, हिंगोली , वाशीम , अकोला तसेच मलकापूर हे थांबे घेऊन प्रयागराज जवळील प्रयागराज छेवकी स्टेशन वर २४ जानेवारी ला सकाळी १.४५ मिनिटाला पोहचणार आहे.
२)पटणा-नांदेड रेलगाडी क्रमांक -०७७२२
हि रेल्वेगाडी २४ जानेवारीला पाटणा येथून ३.३० दुपारी वाजता सुटेल व हि ट्रेन प्रयागराज जवळील प्रयागराज छेवकी स्टेशन वर रात्री ११.१० मिनिटाला येईल व ती मलकापूर , अकोला , वाशीम ,हिंगोली, बसमत, पूर्णा , नांदेड ला २६ जानेवारीच्या सकाळी ४.३० मिनिटाला पोहचेल .
3)काचीगुडा -पटणा (नांदेड मार्गे ) – रेलगाडी क्रमांक -०७१०३
हि रेल्वे काचीगुडा रेल्वेस्टेशन वरून दुपारी ४.४५ मिनिटाला सुटणार आहे ,हे ट्रेन महाराष्ट्रात धर्माबाद, उमरी ,मुखेड ,नांदेड ,पूर्णा, बसमत, हिंगोली ,वाशीम ,अकोला व मलकापूर स्टेशन वर थांबणार आहे
हि ट्रेन प्रयागराज जवळील प्रयागराज छेवकी स्टेशन वर जाणार आहे . येथून प्रयागराज हे १०किमि च्या अंतरावर आहे.
४ ) पटणा-काचीगुडा(नांदेड मार्गे )-रेलगाडी क्रमांक -०७७२६
हि रेल्वे पाटणा येथून सुटणार असून महाष्ट्रातील मलकापूर , अकोला , वाशीम, हिंगोली , वसमत , पुर्णा, नांदेड , उमरी ,धर्माबाद येथे थम्बई देखील आहेत .
५ ) औरंगाबाद -पाटणा -औरंगाबाद
तसेच औरंगाबाद म्हणजेच संभाजी नगर वरून सुद्धा प्रयागराज साठी स्पेसिअल ज्यादा रेल्वे गाडी सोडली जात आहे .
अश्या ह्या ज्यादा गाड्या सोडल्या जाणार आहेत, या मुले संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविकांची जंय येण्याची सोय होईल . ह्या गाड्या विषयी अधिक माहिती तुम्ही IRCTC APP वर तसेच तुमच्या जवळच्या रेल्वेस्टेशन ला भेट देऊन घेऊ शकता .
तुम्हाला हि माहित आवडली असेल आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .