See detailed Information about Places to go in Nagpur-Best places to visit in Nagpur
Places to go in Nagpur-Best places to visit in Nagpur-नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी तसेच संपूर्ण देशाचे केंद्र बिंदू म्हणजेच center पॉईंट म्हणून प्रसिद्ध असलेले , संत्र्या साठी म्हणजेच orange साठी संपूर्ण जगात नाव लौकिक असलेले शहर म्हणजे नागपूर .
आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत नागपूर मधील काही ठिकाणांची माहिती जी आपण नागपूर ला भेट दिल्यावर नक्की पाहायला हवीत .
नागपूर म्हटलं कि सगळयांना आठवत म्हणजे येथील नागपुरी गोड रसाळ ताजी संत्री , हल्दीराम चे orange बर्फी तसेच तर्री पोहे , सावजी ची खानावळ परंतु नागपूर मध्ये एवढंच आहे का तर नाही आम्ही आपल्याला ह्याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर देणार आहोत .
चला तर पाहुयात नागपूर मधील Places to go in Nagpur-Best places to visit in Nagpur.
१)दीक्षाभूमी स्तूप -धम्म चक्र स्तूप
दीक्षाभूमी स्तूप हे आशिया खंडातील सर्वात मोठे स्तूप असून ,येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोद्ध धर्माची दीक्षा घेतली होती . त्या मुले ह्या पवित्र भूमी ला दीक्षा भूमी म्हटले जाते .
येथे भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून पर्यटक व भाविक वर्ष भर भेट देतात , येथे मुख्यतः श्रीलंका , जपान, थायलंड , भूतान , चीन इत्यादी देशातून लोक भेट देण्यासाठी येतात .
येथील स्तूपाची उंची १२२ फूट असून अत्यन्त सुंदर अश्या संगमरवर दगडाचा वापर करून हा स्तूप उभारला आहे .
१४ ऑक्टोबर म्हणजेच धम्म परिवर्तन दिनानिमीत्य दर वर्षी लाखो लोक येथे येतात .
२)फुटाळा तलाव – Futala Lake
नागपूर रेल्वे स्टेशन पासून अवघ्या १५ मिनिटाच्या अंतरावर म्हणजेच ५ किमी अंतरावर फुटला तलाव असून हा तलाव १८ व्या शतकात भोंसले साम्राज्याच्या काळात बांधला गेला होता व तेव्हा पासून आज पर्यंत नागपूर व परिसरात हा तेवढाच जास्त प्रसिद्ध आहे .
अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्ना मुले येथे खूप विकास होऊन येथे खूप भव्य असे लेजर लाईट फाऊंटेन तयार करण्यात आपले असून , येथे रोज सायंकाळी ७.३० मिनिटाला जवळ पास ४० मिनिटाचा फाऊंटेन शो दाखवला जातो है शो मध्ये जगप्रसिद्ध संगीतकार A . R .Rahman यांनी संगीत दिलं आहे .
३) श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर –
देवी लक्ष्मी व माता जगदंबा देवीला समर्पित असलेले नागपूर मधील हे एक प्रसिद्ध मंदिर असून हे एक प्राचीन व अति सुंदर मंदिर असून , येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात . या मंदिराला नागपूर परिसरात कोराडी मंदिर म्हणून हि ओळखले जाते .
हे मंदिर नागपूर रेल्वे स्टेशन पासून साधारण १५ किमी अंतरावर आहे .
४)श्री गणेश मंदिर टेकडी – गणेश टेकडी मंदिर
हे नागपूर मधील स्वयंभू गणेश मंदिर आहे , असे मानतात कि येथील गणेश मूर्ती हि कोणत्याही व्यक्तीने स्थापन केली नसून येथे स्वयं गणेश जी स्वतः विराजमान झाले आहेत म्हणून ह्या मंदिराला स्वयंभू असे म्हणतात .
येथे भाविक संपूर्ण शहरातून येतात गणेश चतुर्थीला येथे प्रचंड भाविकांची गर्दी असते .
हे एक भव्य व अति सुंदर बारीक नक्षीकाम केलेले मंदिर असून रात्रीची ह्या मंदिराची शोभा खूप सुंदर दिसते . हे मंदिर नागपूर रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ७०० मीटर अंतरावर आहे .
५)महाराजबाग झू
हे नागपूर मधील प्राणी पक्षी व फुले तसेच दाट सुंदर झाडांसाठी प्रसिद्ध असलेले झू आहे . महाराजबाग हे सुमारे २०० वर्ष जुने असून ह्याची स्थापना भोंसले राज्यांनी १८ व्या शतकात केली पूर्वी हे राज घराण्याची बाग होती नंतर कालांतराने या बागेला झू मध्ये बदलण्यात आले .
सध्या या झू मध्ये सिंह , बिबट्या , वाघ , मगर , हरीण व इतर खूप प्राणी व पक्षी आहेत हे सर्व प्राणी पक्षी पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात .
महाराजबाग झू नागपूर रेल्वे स्थानकापासून २.५ किमी अंतरावर आहे.
६)हजरत बाबा ताजुद्दीन दर्गाह
बाबा ताजुद्दीन दर्गाह ही नागपूर शहरातील खूप पवित्र स्थानांपैकी एक असून येथे सर्व धर्माचे भाविक येतात , हि दर्गाह अतिशय सुंदर व भव्य असून शहरातील ताजबाग परिसरात आहे .
येथे दर वर्षी एक भव्य असा उरुस भरतो तेव्हा संपूर्ण नागपूर जिल्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात .
ही दर्गाह नागपूर रेल्वे स्टेशन वरून ७.५ किमी अंतरावर आहे .
७) ड्रॅगन पॅलेस मंदिर –
हे एक सुंदर असे बौद्ध विहार म्हणजेच मंदिर असून येथे चंदनाची बुद्धमूर्ती आहे , या मंदिराची रचना खूप सुंदर असून संपूर्ण देशातून भाविक येथे येतात, हे मंदिर जवळ पास १० एकर जमिनीमध्ये आहे .
येथे आल्यावर अतिशय शांत व मनाला प्रसन्न वाटते .
हे मंदिर कामठी या ठिकाणी उभारले आहे .हे मंदिर नागपूर रेल्वे स्टेशन पासून १७ किमी अंतरावर आहे .
तुम्हाला आम्ही दिलेली places to go in nagpur-best places to visit in nagpur हि माहिती आवडली असेल तर आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .