परळी city information,city vishayi mahiti
परळी Parli city vishayi mahiti MH23
मित्रानो चला आज आम्ही तुम्हाला आपल्या परळी विषयी अशी माहिती देणार आहोत कि आपण वाचून चकित होणार , महाराष्ट्रात अनेक शहरे आहेत जवळ पास ५३५ परंतु परळी ला खूप मोठा ऐतेहासिक भोगोलिक व औद्योगिक वारसा लाभला आहे .
परळी हे शहर महाराष्ट्रातील मराठवाडा प्रशासकीय विभागातील बीड जिल्ह्यात असून हे बीड मधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे .
परळी हे राज्यातच नाही तर संपूर्ण देशात नावाजलेलं व प्रसिद्ध असं शहर आहे ,परळी ला लाभलेलं भोगोलिक ,ऐतेहासिक तसेच राजकीय वारसा त्या मागचा मोठा व मोलाचा वाटा आहे .
परळी चे वैशिष्ट सांगायचे तर त्यात अनेक गोष्टी येतात त्या मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात असलेलं १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेलं परळी वैजनाथाचे मंदिर , परळी वैजनाथ रेल्वेस्टेशन , परळी thermal पॉवर प्लांट म्हणजेच औष्णिक विदुयत निर्मिती केंद्र .
चला वरील सर्व बाबी विषयी सविस्तर माहिती घेऊ
परळी वैजनाथाचे मंदिर-
परळी ज्योतिर्लिंगा हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगा पैकी एक आहे ,हे एक अति प्राचीन व जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते , हे मंदिर परळी शहरात असून येथे येण्यासाठी रास्ता तसेच रेल्वे ची सुद्धा कनेक्टिविटी आहे , असे मानले जाते कि हे मंदिर देवगिरीच्या यादव साम्राज्यच्या काळात बांधले गेले आहे व नंतर अहिल्याबाई होळकर ह्यांनी ह्याची जीर्णोद्धार केला आहे .
येथे वर्ष भर भाविक संपूर्ण भारतातून येतात परंतु महाशिवरातीच्या दिवशी येथे प्रचंड भाविक येतात व महादेवाची पूजा करून दर्शन करतात .
असे मानतात कि येथे येऊन परळी वैजनाथाचे दर्शन घेतल्यावर सुख शांती तसेच संपूर्ण कुटुंबाला समृद्धी मिळते.
परळी थर्मल पॉवर स्टेशन -औष्णिक विदुयत निर्मिती केंद्र(Parali Thermal Power Plant)-
परळी औष्णिक विदुयत निर्मिती केंद्र हे मराठवाड्यतील एकमेव व सर्वात मोठे विदुयत निर्मिती केंद्र आहे.
ह्याची एकूण कॅपॅसिटी हि 1380MW असून त्यातून सध्या 690mw वीज निर्मिती केली जाते .
हा पॉवर प्लांट औष्णिक प्रकारचा आहे म्हणजेच येथे कोळसा पासून मुख्यतः वीज निर्मिती केली जाते , म्हणजेच दगडी कोळसा म्हणजेच coal जाळून ऊर्जा निर्मिती केली जाते व नंतर ह्या ऊर्जेपासून पाण्याची वाफ तयार केली जाते व ही उच्च दाबाची वाफ टर्बाइन्स वर टाकली जाते व ही टर्बाइन्स आपल्या फिंगरी सारखी असतात व ते फिरल्यावर जेनेरेटोर फिरते व वीज निर्मिती होते .
ह्यात सर्वात महत्वाचे म्हणजे कोळसा हा कोळसा परळी येथे इंडियन रेल्वे च्या माध्यमातून आणला जातो .ह्या
विदुयत निर्मिती केंद्रामुळे शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे व शहराची तसेच बीड परभणी नांदेड हिंगोली येथील विजेचा प्रशा मिटला आहे.
ह्या विदुयत निर्मिती केंद्रामध्ये काम करणाऱ्या नौकरी वर्ग साठी वैवस्तीत व भव्य अशी वसाहत देखील परळी शहरात स्थापन केली गेली आहे .ही विदुयत निर्मिती केंद्र महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी च्या मालकीचे आहे .ह्याची स्थपणा १९७१ मध्ये झाली आहे.
इतर माहिती –
परळी शहरामध्ये परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन असून हे हे अति जुने रेल्वेस्टेशन आहे , हे रेल्वेस्टेशन सौथ सेंट्रल रेल्वे – secundrabad मध्ये येते , ह्या स्टेशन चा स्टेशन कोडे हा PRLI आहे .हे रेल्वे स्टेशन हैद्रराबाद ,निझामाबाद ,तिरुपती ,बैंगलुरू ,मुंबई परभणी नांदेड ची जोडले गेले आहे .
परळी शहर हे अंबाजोगाई शहरापासून २५ किमी दूर आहे तसेच Latur पासून ६६ किमी आहे .तसेच परभणी पासून ६५ किमी आहे .
लातूर शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा
अंबाजोगाई शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा
आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर शहराची माहिती नक्की वाचा धन्यवाद.