See detailed information about One day picnic spot near Pune here
One day picnic spot near Pune-पुणे म्हटलं कि डोळ्या समोर येतात ते वाहनांनी गच्च भरलेले रस्ते , सिंग्नलस , माणसाची गर्दी तसेच उच्च आकाशाला भिडणाऱ्या इमारती , कधी तर इमारतीच्या मागे लपून बसलेला सकाळचा सूर्य आणि सोमवार ते शुक्रवार मोटार गाडी पेक्षा पण अधिक वेगाने कार्यालयासाठी धावणारे तुम्ही आम्ही म्हणजेच सर्वसामान्य माणूस ….
परंतु ह्या सर्व दैनंदिन काम काजा पासून आपल्या सर्वाना मिळतो तो म्हणजे शनिवार व रविवार त्यातील एक दिवस तर भाजीपाला , दळण म्हणजेच पीठ आणणे , कपडे लौंद्री वरून आणणे व बरेच काही मग आपल्या साठी उरतो फक्त एक दिवस , त्याच एका दिवसात आपण काय करू शकतो ह्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये सगळ्यात चांगले उत्तर म्हणजे १ दिवस पुण्यापासून जवळच एक दिवसाची पिकनिक करून मनसोक्त एक दिवस स्वतःसाठी घालावा .तर या एका दिवसात जावे कुठे हेच आम्ही आपल्याला आज सांगणार आहोत
चला तर मग पाहुयात one day picnic spot near pune कोणते आहेत ते-
१)भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य -Bhimashankar Wildlife Sanctuary (113 km From pune)
हे अभयारण्य पुणे शहरापासून ११३ किमी अंतरावर असून पुणे जिल्यातील मुख्यतः खेड तालुक्यात वसलेले आहे , हे अभयारण्य सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटात पसरलेले असून येथे अत्यन्त घनदाट झाडांचे जंगल आहे , या घनदाट जंगला मुळेच या परिसरात जैवविविधतेचे संतुलन राखण्यासाठी मदत झाली आहे .
हे म्हणजेच भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य शेकरू या प्राण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे , याच शेकरू च्या दुसऱ्या प्रजातीला गावाकडे खारू ताई किंवा खडोली असेही म्हणतात , आपण सर्वानी गावाकडे झाडावर धिंगाणा करणारी खारुताई पहिली असेलच .
याच अभयारण्याच्या परिसरात १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर सुद्धा येथेच आहे .
येथील घनदाट जंगलात झाडाच्या सावलीत फिरणे ,अनेक प्रकारच्या पक्षांच्या चिवचिवाट , व प्राण्याचे इकडून तिकडे वावरणे आणि ह्या सर्वाना सूर द्यायला खळ खळ नाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मनाला स्वर्गीय अनुभव येतो .
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ला येऊन म्हणजेच निसर्गाच्या कुशीत येऊन one day picnic करू शकता व मनाला व शरीराला उत्स्फूर्त करू शकता .
येथे येण्यासाठी पुण्यावरून वाकडेवाडी बस स्टॅन्ड म्हणजेच MSRTC शिवाजी नगर बस स्टॅन्ड वरून भरपूर बस सुटतात तसेच स्वारगेट बस स्टॅन्ड वरूनहि काही बस येतात .येथे येण्यासाठी बस चे तिकीट हे १५० ते २०० रुप्याच्या दरम्यान आहे .येथे येण्यासाठी बस ने जवळ पास ३ तास लागतात तर कार ने २ ते २.३० तास लागतात .
२)पाचगणी – महाबळेश्वर -(100 km From pune)-
पंचगणी म्हणजेच पाचगणी म्हटलं कि डोळ्या समोर येत ते डोंगरा वरील वळणदार रस्ते दात झाडी थंड हवा व संथ वाहणारी नदी … हो बरोबर पाचगणी ला गेल्यावर मनानी केलेली हे सर्व कल्पना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून विश्वासच बसत नाही एवढं सुंदर आहे .
पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात असून येथे असलेल्या टॅबलेलँड सपाट प्रदेशाचे नाव या प्रदेशाच्या भोवती असलेल्या पाच टेकड्या तसेच १)आंबराल,२)ताईघाट,३)दांडेघर ,४)गोदावली ,५)किंगर या पाच खेडे गावावरून ह्याचे नाव पाचगणी असे पडले .हे आशिया खंडात तिबेटच्या पठारानंतर सर्वात मोठे थंड हवेचे पठार आहे .या पठारावर अत्यन्त थंड हवा सुटते जी आपल्या मानला हवीहवीशी वाटते या पठारावच एक छोटेशे पाण्याचे तळे आहे , येथे घोड्यावरून सवारी करण्यास मिळते त्याचा एक वेगळाच अनुभव आहे .
येथे आल्यावर अनेक ठिकाण आहेत जे आपण येथे आल्यावर पाहायला हवीत
a) टेबल लंड – येथून कृष्णा नदीचा खूप सुंदर असा जलाशय तसेच पाचगणी च्या आजूबाजूची सुंदर खेडी खूप आकर्षित करतात , तसेच येथे पठाराला लागूनच काही गुफा पण आहेत त्या हि खूप सुंदर व मनाला विश्रांती देतात .त्यांना टायगर caves म्हणून ओळखले जाते .
b)सिडनी सनसेट पॉईंट – येथे उंचावरून हिरवीगार झाडीने पांघरून घातलेल्या टेकड्या मधून तांबट झालेल्या सूर्य मावळताना खूप सुंदर वाटत .
c)पारसी पॉईंट –
हा पॉईंट टेबल लंड पॉईंट वरून फक्त ४ किमी अंतरावर असून हा पॉईंट महाबळेश्वर रोड असून येथून कृष्णा नदी व धूम डॅम येथून खूप सुंदर दिसतो येथे आल्यावर असं वाटत कि आपण हे एक सुंदर अशी पैंटिंग पाहतोय .
d) पाचगणी स्ट्रॉबेरी फार्म –
पाचगणी ला आलो आणि एखाद्या स्ट्रॉबेरी फार्म ला गेलो नाही म्हणजे मंदिराला भेट देऊन देव पहिला नाही असं होईल , येथे आल्यावर ताझे स्ट्रॉबेरी खायला काही वेगळीच मज्जा येते .
३)महाबळेश्वर – (123 km From pune)
पाचगणी वरून फक्त २३ किमी अंतरावर असलेले हे एक अत्यन्त सुंदर असे थंड हवेचे ठिकाण असून ,
येथे एक अति प्राचीन भगवान शंकराचे मंदिर असून येथी महादेवाची पिंड हि सुमारे ५०० वर्ष्या पेक्षा जास्त जुनी असल्याचे येथे मानले जाते .
तसेच महाबळेश्वर ला येताना लिंगमाला धबधबा असून तो पावसाळ्यत पांढ शुब्र दिसतो हे खूप मोहक असे दृश्य पाचगणी वरून महाबळेश्वरला जाताना दिसते ,महाबळेश्वर येथेही अनेक पाहण्यासारखे पॉईंट्स आहेत .
४)दिवेआगर -(160 km From pune)
हे ठिकाण पुण्यापासून १६० किमी अंतरावर असून हे रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्यात आहे .
आपण लहान पणा पासून कोकण व कोकणाबद्दलच्या अनेक गोष्टी शाळे मध्ये होतो तेव्हा पासून ऐकतोय , कोकणात आंब्याच्या , फणसाच्या , काजू च्या नारळाच्या बागा असतात , खूप दाट झाडी असते , राहत्या घरापासून एक हाक भर अंतरावर समुद्र किनारा असतो हे सर्व काही दिवेआगर ला गेल्यावर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर लहान पणी ऐकलेल्या सर्व गोष्टी आठवतात हे नक्की .
दिवेआगर हे कोकणातील अत्यन्त प्रसिद्ध व पर्यटनासाठी खूप चांगले ठिकाण आहे , हे एक पर्यटन स्थळ असून सुद्धा येथे माणसांची जास्त गर्दी नसलेले व स्वच्छ आणि शांत ठिकाण आहे .
येथील टुमदार कौलारू घरे त्याच्या आजूबाजूच्या बागा , सुंदर अशी देवालये पाहिल्यावर मन एका वेगळ्याच दुनियेत जात व कल्पनेतील खरे पणा हाच आहे असे आपल्या ठोठावून सांगते .
दिवेआगर येथे खूप सुंदर असे दिवेआगर गाव , कोकणी संस्कृती , निसर्ग , अथांग पसरलेला समुद्र व त्याच्या बाजूचा समुद्र किनारा आहे .
a)दिवेआगर समुद्र किनारा –
येथील समुद्र किनारा हा ५ किमी लांबीचा असून येथे इतर समुद्र किनारी प्रमाणे माणसाची प्रचंड गर्दी नसते , त्याच्या च बाजूला खूप सुंदर खायला मिळणारे असंख्य हॉटेलस आहेत .
तसेच येथे अनेक वॉटर ऍक्टिव्हिटी बोटिंग , बनाना राईड तसेच बऱ्याच ऍक्टिव्हिटी करण्यासाठी मिळतात .
b)सुवर्ण गणपती मंदिर दिवेआगर –
हे एक अतिशय सुंदर कोकणी लाल दगडात बांधलेले मंदिर असून येथे जमिनीखाली सोन्याचा गणपतीचा मुखवटा सापडला होता व हे येथील महत्वाचे आस्चर्य आहे . मंदिराच्या आजूबाजूला खूप दाट व हिरवीगार अशी नारळाची व सुपारीची बाग आहे .येथे आल्यावर मानला अत्यन्त प्रसन्न वाटते .
c)रुपनारायण व सुंदर नारायण मंदिर दिवेआगर –
हे दोन्हीही खूप सुंदर अशी मंदिरे दिवेआगर मध्ये असून येथे आल्यावर या मंदिराला पण भेट देणे आवश्यक आहे कारण येथील निसरन्ग पाहून व मंदिराची सुंदरता पाहून तुम्हला चांगले वाटेल हे नक्की .
४)माथेरान -(120 km From Pune)
हे एक थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यात असून हे पुणे पासून १२० किमी अंतरावर आहे तसेच मुंबई पासून ८५ किमी अंतरावर आहे.
जर तुम्हला सुंदर निसर्ग, पाण्याचे पांढरे शबर धबधबे , घोड सवारी , टॉय ट्रेन व अनेक देखणे पॉईंट्स एकाच ठिकाणी पाहायचे असतील तर ते सर्व मिळेल एकाच ठिकाणी ते म्हणजे माथेरान .
येथे वर सांगितले धबधबे , सुंदर निसर्ग , हॉर्स रायडींग , अनेक view पॉईंट्स तसेच टॉय ट्रेन हे सर्व ठिकाण असून येथे पावसाळ्यत व हिव्हाळ्यात भरपूर पर्यटक पुणे व मुंबई वरून तसेच संपूर्ण देशातून येतात.
वरील ठिकाणांना सोडून पुण्याच्या आजू बाजूला One day picnic spot near Pune खूप आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे-
१)ताम्हिणी घाट – (54 km from pune )
सुंदर दाट झाडांनी व डोंगरांनी वेढलेले रस्ते , धबधबे , व बरेच काही .
२)लोणावळा – (66 km from pune )
हे एक हिल स्टेशन असून पावसाळ्यत येथे खूप पाहण्यासारखा निसर्ग रम्य ठिकाणे आहेत , येथे बरीच बॉलीवूड , ऍक्टर लोकांचे फार्म हाऊस आहेत. तसेच येथील शेंगदाणे , ड्रायफ्रूट चिक्की खूप प्रसिद्ध आहे .
३)पानशेत डॅम – (40 km from pune )
हे पुण्याला लागून असलेले ठिकाण असून डोंगराच्या कुशीत असलेले डॅम व त्या मार्गावर असलेल्या नदी काठचा सुंदर रस्ता मनाला खूप प्रस्सन करतात .
आम्ही वर सांगितलेले One day picnic spot near Pune सर्व ठिकाणी पुणे वरून तुम्ही एका दिवसात भेट देऊन येऊ शकतात व आपल्या दररोज च्या दैनंदिनी कामातून स्वतःला थोडा वेळ देऊन निसर्गासोबत घालवू शकता .
तुम्हाला आम्ही दिलेली One day picnic spot near Pune हि माहिती आवडली असेल आमच्या Website वरील इतर माहित नक्की वाचा धन्यवाद .