Nanded मध्ये NEET साठी कोणता कोचिंग क्लास सर्वोत्तम आहे, Best Neet क्लासेस नांदेड मध्ये कुठे आहेत ,क्लास साठी नांदेड मध्ये कुठे राहावे, महिन्याला कमीत कमी किती खर्च येईल? पहा ही सर्व माहिती-Nanded NEET classes

पहा येथे नांदेड मधील बेस्ट नीट क्लासेस ,ते क्लास नांदेड मध्ये आहेत कुठे ,क्लास साठी नांदेड मध्ये कुठे राहावे, महिन्याला कमीत कमी किती खर्च येईल ही सर्व माहिती Nanded NEET classes 

Nanded NEET classes-या अगोदर आम्ही आपल्या नांदेड सिटी बद्दल माहिती दिली तसेच नांदेड मधील खरेदी साठी कुठे जावे या बाबत हि माहिती दिली , पण नांदेड खरेदी , भेट देण्यासाठी असलेली काही ठिकाणं या मुळेच प्रसिद्ध आहे का ? तर नाही .
नांदेड सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे nanded neet classes येथील ११ वि १२ व NEET च्या क्लास साठी , चला तर मग पाहुयात नांदेड मध्ये NEET साठी कोणते क्लासेस चांगले आहेत ,हे क्लासेस कुठं आहेत , येथे कुठे राहावे , कुठे मेस म्हणजेच जेवणासाठी खानावळ लावावी ,एकूण महिन्याला किती खर्च येईल हि सर्व माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत

Nanded NEET classes-

१)कोनाळे क्लासेस नांदेड (Konale classes Nanded)-

हा क्लास NEET तसेच ११वी १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असून येथे chemistry ,physics ,Mathematics ,Biology इत्यादी विषयांसाठी असून येथे सर्व विषयाच्या चांगल्या प्रकारे बोर्ड परीक्षा तसेच NEET ,JEE परीक्षेची तयारी करून घेतली जाते .
पूर्वी म्हणजेच २००९,२०१० पर्यंत फक्त chemistry हा स्वतंत्र विषय शिकवलं जात असे नंतर येथे सर्व विषयाची शिकवणी देण्यास सुरुवात करून चांगला निकाल पाहावयास मिळाला , त्या मुळे नांदेड मध्ये कोनाळे क्लासेस खूप प्रसिद्ध झाला आहे .
येथे सर्व विषय उच्च शिक्षित शिकांकडून शिकवले जातात तसेच प्रत्येक विषयाचे सराव परीक्षा व प्रत्येक विषयाचे नोट्स चॅप्टर नुसार दिले जातात .

हा क्लास कुठे आहे ?

हा क्लास नांदेड मध्ये ३ वेगवेगळा ठिकाणी आहे भाग्य नगर रोड वर हर्ष नगर नांदेड येथे JEE साठी स्वतंत्र व्यवस्था आहे ,तसेच भाग्य नगर जवळच यशवंत कॉलेज रोड वर श्याम नगर नांदेड येथे सावित्रीबाई फुले शाळेसमोर कोनाळे नीट सेंटर आहे .तसेच कोनाळे coaching center हे रेल्वे स्टेशन रोड विष्णू नगर नांदेड म्हणजेच स्टेडियम च्या जवळ आहे .

Nanded NEET classes

 

2)IIB classes नांदेड(आय आय बी क्लासेस नांदेड )

IIB नांदेड मधील एक खूप जुना वैद्यकीय शिक्षण घेण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास असून येथे पूर्वी खूप दुरून विद्यार्थी Biology विषय शिकण्यासाठी येत असत , परंतु विद्यार्थ्यांना इतर विषयांसाठी इतर क्लास शोधावा लागत असे व त्यात त्याचा खूप वेळ जात असल्याचे लक्षात आल्यावर IIB यांनी येथे सर्व विषय शिकवायला सुरुवात करून भरपूर चांगला निकाल दिला ,त्या मुळे सर्व विषयाचे साठी एकाच ठिकाणी क्लास मिळाला व हजारो विद्यार्थी या क्लास मुळे डॉक्टर झाले हे नक्की ,येथे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून विद्यार्थी Neet तसेच ११ वी १२ वी ची शिकवणी घेण्यासाठी येतात .

IIB नांदेड मध्ये कुठे आहे ?

IIB चे भव्य व सर्व सेवांनी परिपूर्ण अशी इमारत हे भाग्य नगर चौकच्या अगदी जवळ त्याचा पत्ता हा भाग्य नगर रोड ,श्याम नगर नांदेड हा आहे .

 

३) Physicswala Classes (फिज़िक्सवाला क्लासेस नांदेड )

हा नांदेड मधील सर्व विषयासाठी खूप प्रसिद्ध असलेला क्लास असून हा क्लास जवळ जवळ सर्व भारतातील विद्यार्थ्यांना माहिती आहे . ह्या क्लास मध्ये शिकलेल्या अनेक विद्यार्थी भारतातील अनेक IIT तसेच MBBS कॉलेज मध्ये शिकून चांगले डॉक्टर तसेच इंजिनीयर झाले आहेत .
ह्या क्लास चे वैशिष्ट्ये म्हणजे हा क्लास खूप कमी दरामध्ये online हि करू शकता ज्या मुळे लाखो विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा झाला आहे .
प्रत्यक्ष क्लास करण्यासाठी नांदेड मध्ये ह्याचे सर्व सोयी सुविधा असलेले सेंटर झाल्यामुळे खूप विद्यार्थ्यांना अजून एक विकल्प नांदेड मध्ये उपलब्ध झाला आहे .

फिज़िक्सवाला क्लासेस नांदेड मध्ये कुठे आहे ?

हा क्लास नांदेड मध्ये भाग्य नगर चौकाच्या जवळ भाग्यनगर रोड वर कमल हाईटस हैदर बाग विष्णू नगर येथे आहे .

या सोबत चा नांदेड मध्ये अनेक नीट साठी क्लासेस आहेत जसे कि आकाश बायजूस ,ऍलन इत्यादी हे सर्व क्लास्सेस यशवंत कॉलेज रोड ते भाग्य नगर रोड या भागात आहेत .

 

नांदेड मध्ये आल्यावर बस स्टॅन्ड तसेच रेल्वे स्टेशन वरून क्लासेस च्या भागात कसे जावे ?

नांदेड मध्ये बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन हे एकमेकांच्या बाजूलाच आहेत त्या मुळे ह्या दोन्ही ठिकाणावरून ऑटो रिक्षा भाग्य नगर चौक साठी किंवा यशवंत कॉलेज रोड साठी पकडावा लागेल या दोन्ही ठिकाणी शेअर ऑटो घेतल्यास २० रुपये प्रत्येकी घेतील व स्वतंत्र ऑटो घेतल्यास ७० ते ८० रुपयांमध्ये क्लासेस च्या ठिकाणी सोडतात .

 

क्लासेस साठी आलेल्या विद्यार्थ्यांनी कुठे राहावे ?

नांदेड मध्ये बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांनी क्लासेस जवळ च राहिले तर चांगले परंतु सर्वच जण क्लासेसच्या जवळ राहत असल्यामुळे बाबा नगर किंवा भाग्य नगर या भागात घर भाडे म्हणजेच रूम रेंट हा थोडा जास्त आहे .
परंतु ज्यांना कमी पैशांमध्ये राहायचं असेल त्यानी कैलास नगर , तसेच विवेक नगर , श्रीनगर या भागात राहू शकतात या भागात राहिलात तर तुम्हाला थोडा कमी दरात रूम्स मिळतील व तुम्ही या भागातून ट्युशन साठी पायी येऊ शकता या साठी तुम्हाला ५ ते १० मिनिटे पायी चालावे लागेल , तसेच ऑटो रिक्षा १० रुपये भाडे घेऊन क्लासेस जवळ सोडतात .
ज्यांच्या कडे सायकल किंवा मोटार सायकल आहे असे विद्यार्थी तरोडा नाका तसेच काबरा नगर या भागातही रूम भाड्याने घेऊ शकतात .

मेस म्हणजेच महिन्याने खानावळ कुठे लावावी ?

नांदेड मध्ये विद्यार्थ्यांना जेवणासाठी पुष्कळ ठिकाणी सहज मेस मिळते . तुम्ही मेस वर जाऊन पोट भर जेवण करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या रूमवर सुद्धा डब्बा आणून दिला जातो .
भाग्य नगर , श्रीनगर , कैलास नगर , विवेक नगर , बाबा नगर तसेच यशवंत कॉलेज रोड या भागात तुम्हाला भरपूर साऱ्या मेस मिळतील येथे १८०० ते २२०० रुपयांमध्ये पोट भर २ वेळचे जेवण तुम्हाला सहज मिळते .

 

नांदेड मध्ये महिन्याला राहण्यासाठी किती खर्च येतो ?

विद्यार्थ्यांना महिन्याला किती खर्च येतो हे विद्यार्थी कुठे राहतात , कुठे खातात तसेच त्याचा इतर खर्च किती आहे या वर अवलंबून आहे ,परंतु आम्ही येथे आम्ही वर सांगितलेल्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला मेस चे २००० हजार
रूम भाडे १५०० ते २००० हजार
ऑटो रिक्षा ६०० तसेच इतर खर्च १००० या नुसार ५००० ते ६००० रुपये खर्च येऊ शकतो .

 

या व्यतिरिक्त क्लासेस ची फीस हे सर्व पहिले तर बरेच पैसे लागतात , हे सर्व पैसे विद्यार्थ्यांचे पालक खूप कष्टाने देतात ,कारण आपले पाल्य म्हणजेच मुलगा किंवा मुलगी चांगली शिकावी व डॉक्टर इंजिनीयर होऊन मोठी व्हावी , या सर्व गोष्टीची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे .

तुम्हाला आम्ही दिलेली Nanded NEET classes हि माहिती आवडली असल्यास व तुम्हला उपयोगी वाटल्यास आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा तसेच नांदेड मध्ये आल्यावर कुठे खरेदी करावी ह्या साठी बेस्ट शॉपिंग प्लेसेसे इन नांदेड हे वाचा धन्यवाद .

Leave a Comment