Nanded Information-Nanded Vishayi mahiti -Mh26 Which City?नांदेड शहर व नांदेड जिल्ह्याची माहिती

Nanded Vishayi mahiti -Mh26 Which City? नांदेड शहर व नांदेड जिल्ह्याची माहिती Mh26

नमस्कार मित्रानो आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील अश्या एका शहराविषयी माहिती जी आपल्याला वाचून नक्कीच आश्चर्य व कुतूहल वाटेल ,आणि आम्हाला विश्वास आहे कि तुम्ही या शहराविषयी व जिल्ह्याविषयी आम्ही दिलेली माहिती तीळ खूप काही गोष्टी पहिल्यन्दाच ऐकत असणार,आम्ही बोलत आहोत आपल्या Mh26 म्हणजेच आपल्या नांदेड विषयी.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी म्हणजेच १ मे १९६० ला महाराष्ट्रात फक्त २६ जिल्हे होते त्या मध्ये नांदेड पण एक होते.

 

प्रस्तावना –

नांदेड हे महाराष्ट्रातील मराठवाडा प्रशासकीय विभागातील एक महत्वाचे शहर आहे, नांदेड हे मराठवाड्यातील औरंगाबाद नंतरचे सर्वात मोठे दुसऱ्या क्रमाचे शहर आहे .नांदेड तसे अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे परुंतु येथील सचखंड गुरुद्वारा तसेच ११ वी ,१२ वी व NEET JEE च्या शिकवणी साठी , व सहस्रकुंड धबधबा , माहूरची रेणुका माता मंदिर म्हणजेच माहूर गड .

 

प्रशासकीय व भोगोलिक माहिती-

नांदेड हे महाराष्ट्रातील औरंगाबाद प्रशासकीय विभागातील एक महत्वाचे शहर व जिल्हा आहे , नांदेड मध्ये सध्या १६ तालुके आहेत , महाराष्ट्रात फक्त २ च जिल्ह्यात एवढे जास्त म्हणजेच १६ तालुके आहेत त्यात आपला नांदेड चा समावेश आहे , नांदेड मध्ये १) किनवट ,२)हदगाव ,३)माहूर ,४) हिमायतनगर ,५)भोकर ,६)कंधार ,७)बिलोली ,८)मुखेड ,९)लोहा ,१०)मुदखेड ,११)पेठ उमरी ,१२)देगलूर ,१३)नायगाव ,१४)धर्माबाद ,१५)अर्धापूर,१६)नांदेड ह्या तालुक्यांचा समावेश होतो .नांदेड चे एकूण क्षेत्रफळ १०५२७ sq किमी आहे .
नांदेड च्या उत्तरेस यवतमाळ व हिंगोली जिल्हा तसेच पश्चिमेस परभणी जिल्हा तसेच दक्षिणेस लातूर जिल्ह्याची सीमा लागते ,तसेच नांदेड ला महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणा व कर्नाटक राज्यांची सीमा लागते .

 

इतिहास आणि संस्कृती-

नांदेड ला फार प्राचीन व मोठा इतिहास लाभला आहे ,नांदेड वर अनेक साम्राज्यचे वेगवेगळ्या कालखंडात राज्य केले जसे मोरया , नंदा ,सातवाहन , मुघल व निझामाने सुद्धा त्या मुळेच नांदेड मध्ये सध्या सुद्धा अनेक किल्ले पाहावयास मिळतात . नांदेड चे पूर्वी नंदीग्राम तसेच नंदितट असे नाव होते .नांदेड हे नाशिक मध्ये उगम पावलेल्या गोदावरी नंदीच्या काठी वसलेले एक प्राचीन शहर आहे .
नांदेड मध्ये संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेली देवीच्या साडेतीन पीठ पैके एक असलेले रेणुका देवीचे प्राचीन मंदिर मागून गाद येथे आहे , तसेच कंधार चा १३ व्या शतकात बांधलेला सुप्रसिद्ध किल्ला नांदेड जिल्ह्यातच आहे

 

शेती व व्यवसाय-

Farm

संपूर्ण नांदेड जिल्हा शेती उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे येथे खूप मोठ्या प्रमाणात नगदी पिकाचे उत्पादन घेतले जाते , येथील अर्धापूर , हदगाव , नांदेड, भोकर हा भाग गोदावरी व पैनगंगा नदीच्या खोऱ्यात असल्यामुळे येथील जमीन खूप सुपीक व काळीची आहे , त्या मुळे येथे मोठ्या प्रमाणात केळी, ऊस ,हळद, भुईमूग इत्यादी पिके घेतली जातात .
नांदेड मध्ये अनेक कारखाने म्हणजेच कंपनी सुद्धा आहेत त्यात साखर कारखाने , फूड , केमिकल इत्यादींचा समावेश आहे .
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया च्या MSME नुसार नांदेड मध्ये जवळपास १५००० हजार लोकांना कारखाने म्हणजेच कंपनी पासून रोजगार मिळतो .
नांदेड जिल्ह्यात असलेल्या काही महत्वाच्या कंपन्या –
१) जयवंतराव पाटील शुगर मिल्स लिमिटेड
२)जय अंबिका सहकारी साखर कारखाना
३)भाऊराव सहकारी साखर कारखाना
४)कीर्ती फूड लिमिटेड ,धर्माबाद नांदेड
५)जय कॉर्पोरेशन लिमिटेड .
६)टाटा केमिकल लिमिटेड .

 

शिक्षण –

शिक्षणासाठी नांदेड जिल्हा फार जुन्या काळापासून खूप प्रसिद्ध आहे ,सध्या जिल्ह्यात जवळपास २६०० शाळा आहेत, तसेच नांदेड शहरात अनेक शाळा व कॉलेज खूप प्रसिद्ध आहेत येथे नांदेड च्या शेजारील हिंगोली परभणी , यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात . तसेच ११ वी ,१२ वी व NEET JEE च्या शिकवणी साठी नांदेड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे येथील IIB , Konale ,Makne ,Mundhe ह्या शिकवणी खूप प्रसिद्ध आहेत .
तसेच नांदेड मधील प्रतिभा निकेतन शाळा , महात्मा फुले शाळा आपल्या प्राचीन व उज्वल निकालासाठी प्रसिद्ध आहेत , येथील विद्यार्थी आज संपूर्ण भारतात खूप मोठ्या मोठ्या पदावर पाहावयास मिळतात .
नांदेड मधील काही प्रसिद्ध कॉलेजेस –
१)यशवंत कॉलेज नांदेड (Yashwant College Nanded)
२) पीपल्स कॉलेज नांदेड (People’s college Nanded )
३)सायन्स कॉलेज नांदेड (Science college Nanded )

 

इतर माहिती –

नांदेड मध्ये मनोरंजनासाठी अनेक गोष्टी आहेत , नांदेड जिल्हा क्रीडा मैदान , तसेच Bharat e square Talkies , तसेच PVR Treasure Bazar Mall Talkies .गोदावरी काठ .
नांदेड मध्ये किराणा खरेदी साठी २ D Mart आहेत , त्या पैकी एक तरोडा नाक्या जवळ आहे .
तसेच शॉपिंग म्हणजेच खरेदी साठी वजिराबाद भाग लोकप्रिय आहे .

नांदेड ला रेल्वे काँनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे , येथून संपूर्ण भारतात जाण्यासाठी व येण्यासाठी train मिळतात .तसेच नांदेड ला एअरपोर्ट देखील आहे ,येथून विमानाने बैंगलोरे ,पुणे, अहमदाबाद तसेच हैद्राबाद साठी जात येते.
नांदेड पासून लातूर १३३ किमि तसेच परभणी ७६ किमी अंतरावर आहे .

तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आमच्या वेब्सिते वरची इतर शहरांची माहिती नक्किओ वाचा धन्यवाद.

लातूर शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा

Leave a Comment