Nageshwar Jyotirlinga :औंढा नागनाथ
Nageshwar Jyotirlinga :औंढा नागनाथ विषयी Vishayi Mahiti
नमस्कार आज आम्ही आपल्या साठी घेहून आलो आहोत औंढा नागनाथ विषयी अशी माहिती जी आपण वाचून आश्चर्यत व्हाल , आपल्या देशात एकूण १२ ज्योतिर्लिंगा आहेत ,त्यातील काही महाराष्ट्रात आहेत त्रंबकेश्वर नाशिक ,भीमाशंकर पुणे , परळी वैजनाथ व औंढा नागनाथ .
१२ ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेला औंढा नागनाथ ही एक प्राचीन व अद्वितीय असे भगवान शिवाचे मंदिर आहे व ते नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रचलित आहे .
औंढा नागनाथ ही महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात आहे.औंढा नागनाथ येथे शिवाचे नागेश्वर ची पूजा केली जाते , असे मानतात सर्वात पहिले हे मंदिर महाभारताच्या काळात
पाच पांडव पैकी युधिष्टिर ने बांधले आहे, ह्या वरून अंदाज लावला तर असे कळते हे एक अति प्राचीन असे मंदिर आहे .त्या नंतर हे मंदिर यादव साम्रज्यातील राज्यांनी बांधले , पूर्वी हे मंदिर ७ माजली होते , परंतु मुघल साम्राज्यात ह्या मंदिराची नुकसान करण्यात आली व नंतर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी ह्या मंदिराची जीर्णोद्धार केला .
हे मंदिर अतिशय सुंदर असून असे मानले जाते हे एक एका मोठ्या शीला पासून एका रात्रीत बांधले गेले होते, ह्या मंदिरावर अतिशय बारीक साफ व सुंदर असे शिल्प कोरीव काम पाहण्यास मिळते .हे मंदिर हेमाडपंती प्रकारचे असून येथे संपूर्ण भारतातंतून भक्त येतात .
विशेष म्हणजे या मंदिरात शिवाचे दर्शन मंदिराच्या आत असलेल्या जमिनीच्या खाली असलेल्या खोलीत जाऊन करावे लागते व येथील प्रसन्नता खूप विशेष आहे तसेच इतर मंदिरात नंदी मंदिराच्या समोर असतो ह्या मंदिरात मंदिराच्या पाठीमागे आहे असे मानले जाते हे मंदिर संत नामदेवाच्या भक्तीला प्रसन्न होऊन हे मंदिर फिरले आहे .येथे प्रत्येक सोमवार व शनिवारी भक्ताची प्रचंड गर्दी असते .
नंतर प्रशासनाने येथे येणाऱ्या भक्तासाठी भव्य राहण्याची सोया व्हावी म्हणून भक्त निवास उभारले आहे येथे अगदी मुबलक शुल्कात राहण्याची सोया उपलभ करून दिली आहे तसेच येथे वॉटर बोटींग व सुंदर असे बगीचा औंढा नागनाथ तलाव येथे उभारले आहे .
येथे प्रत्येक शिवरात्रीला रथ यात्रा भरते व त्या साठी संपूर्ण भारतातील भक्त येतात व पूर्ण औंढा नागनाथ नगरी भकमय होऊन जाते .
औंढा नांगनाथ ला येण्यासाठी रेल रोड व विमानाने येत येते .
औंढा नागनाथ वरून हिंगोली २४ किमी आहे व परभणी पासून 52 किमी , तसेच वसमत पासून ३५ किमी अंतावर आहे येथून प्रत्येक ३० मिनिटाला MSRTC बस अगदी मुबलक दारात मिळते .
सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन हे हिंगोली रेल्वेस्टेशन आहे तसेच सर्वात जवळचे airport नांदेड म्हणजेच Shri Guru Gobind Singh Ji Airport आहे ते औंध पासून ७० किमी अंतरावर आहे.
आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर शहराची माहिती नक्की वाचा धन्यवाद.
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग माहिती साठी येथे click करा
लातूर शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा
अंबाजोगाई शहराविषयी माहिती हवी असेल तर येथे click करा