बापरे MSRTC एवढी मोठी आहे खरंच !
MSRTC-नमस्कार मित्रानो आज आम्ही तुम्हाला आपल्या एसटी महामंडळ विषयी अशी माहित सांगणार आहे कि ज्या मुले तुम्हाला एसटी महामंडळ विषयी अभिमान वाटेल हे नक्की ,आता पर्यंत एसटी महामंडळ विषयी तुम्ही बरीच माहिती वाचली असेल परंतु नक्कीच आम्ही जी आज तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही १००% ऐकली सुद्धा नसणार , चला तर जाणून घेऊयात आपल्या एसटी महामंडळ विषयी माहिती .
स्थापना व इतिहास –
एसटी महामंडळ म्हणजेच MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation ) ची स्थापना हि १९५० ला RTC ऍक्ट च्या अंतर्तगत झाली असून हि महाराष्ट्र शासनाद्वारे लोकांसाठी
स्थापन केलीली बस सेवा आहे .सध्या एसटी महामंडाला स्थापन होऊन ७५ वर्ष झाले आहेत ,MSRTC ही भारतातील सर्वात जुनी व भारतातील सर्वात मोठी सरकारी बस सेवा आहे .एवढी मोठी शासकीय बस सेवा संपूर्ण भारतात दुसरी कोणत्याही राज्यात नाहीये .
एसटी महामंडळ किती मोठे आहे ?
सुरुवातीला मुंबई पासून सुरु झालेली बस सध्या महाराष्टातील ३६ जिल्यात पसरलेली आहे ,सुरुवातीला ३० बस ने सुरुवात झालेली एसटी महामंडळाकडे सध्या १८००० बस आहेत एवढ्या बस दुसऱ्या कुठल्याही महामंडळ कडे नाहीत .
एसटी महामंडळ च्या बस संपूर्ण महाराष्ट्रातील शहर ,गाव, खेडे, तांडे तसेच वाड्यात जाते, सध्या महाराष्ट्रात ४१००० खेडी आहेत , ३६ जिल्हे आहेत, व 534 शहरे असून ह्या सगळ्या ठिकाणी एसटी जाते,
या शिवाय एसटी बस हि मध्यप्रदेश , गोवा,कर्नाटक ,गुजरात तसेच तेलंगणा मध्ये सुद्धा जाते ,अहमदाबाद , सुरत ,वडोदरा ,हैदराबाद ,बंगलोर ,पणजी , इंदोर पर्यंत महाराष्ट्राची एसटी महामंडळ ची बस जाते .
या सर्व गोष्टीमुळे एसटी महामंडळ भारतातील सर्वात मोठे पब्लिक ट्रान्सपोर्ट बनले आहे .दररोज एसटी महामंडळ जवळ पास ६०ते ६५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि आपले एसटी महामंडळ दररोज १५ लाख किलोमीटर धावते.तर सांगा आहे कि नाही हे एक अभिमानाची गोष्ट.एवढ्या आपल्या आयुश्यात मोलाचा वाटा असलेल्या एसटी महामंडळ विषयी आपल्याला फार काही माहिती सुद्धा नाही हि खंत आहे .
सध्या एसटी महामंडळ कडे अंदाजे २६० पेक्षा जास्त बस डेपो अजून ५२० पेक्षा जास्त बस स्टॅन्ड आहेत .
सगळं जग प्रगत व तंत्रज्ञाचा उपयोग करत आहे तर ह्यात आपली एसटी पण मागे राहिली नाही काळाच्या गर्जे नुसार एसटी महामंडळ ने विविध प्रकारच्या बस प्रवास्या साठी आणल्या त्याचे प्रकार खालील प्रमाणे
एसटी महामंडळ बस चे प्रकार –
१)शिवनेरी
२)शिवशाही
३)लालपरी म्हणजेच सादी बस
४)परिवर्तन
५) हिरकणी
६)विठाई
७) शिवाई
एसटी महामंडळ च्या विशेष सवलती –
एसटी महामंडळ च्या भरपूर आपल्या प्रवाश्यासाठी सवलती देखील आहे त्या खालील प्रमाणे
१) विद्यार्थ्यंना मासिक मोफत पास सुविधा
२)जेष्ठ नागरिकाना ७५ वर्ष्या पेक्षा कमी वय असलेल्याना ५० टक्के तिकिटात सवलत
3) दिव्यांगांना व त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला विशेष तिकिटामध्ये सवलत
४ ) स्वतंत्र सैनिकांना मोफत प्रवास
५) ७५ वर्ष्या पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकाना १०० टक्के मोफत प्रवास
एसटी महामंडळ चे एकूण कर्मचारी –
तुम्हला सांगू इच्छितो कि एसटी महामंडळ अंदाजे सध्या १०१००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत व ते आपल्या साठी रात्रं दिवस कष्ट करतात , परंतु आपल्या राज्यात इतर शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे त्याना सोयी मिळत नसल्यचे सर्वांच्या निदर्शनास कधी न कधी आले असेल हे नक्की , आपल्या एसटी महामंडळाला देशात एवढा महान करण्यासाठी हेच कर्मचारी कष्ट करतात एवढे नक्की आहे .
आपल्या सर्वांसाठी १२ महिने २४ तास सतत फिरत असलेल्या एसटी महामंडळ विषयी दिलेली हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .
एसटी महामंडळ तिकीट दार वाढ पाहण्यासाठी येथे click करा .