MahaVitaran MSEDCL महावितरण भरती 2024-2024 Document Verification,Zone Wise Allocation List
MahaVitaran MSEDCL Junior Assistant 2024-2025 नमस्कार मित्रानो नुकत्याच ओक्टोम्बर २०२४ मध्ये महावितरण ने घेतलेल्या एकूण ४६८ जागांसाठी जुनिअर असिस्टंट अकाउंट(Junior Assistant Account ) या पदासाठी परीक्षेचं निकाल जरर करून पात्र सदस्यांची लिस्ट जाहीर केली , ह्यात महावितरण ने म्हणजेच MSEDCL ४६८ जगासाठी ५१० सदस्यांची निवड याद जाहीर केली होती , आता ह्यात एक नवीन व अतिशय महत्वाचे बातमी समोर आली आहे .
या निवड यादीतील म्हणजेच ५१० उमेदवारांना महावितरण च्या झोन नुसार म्हणजेच परिमंडळ कार्यालय वाटप व कागदपत्रे पडताळणी साठी बोलवण्यात आले आहे .
निवड झालेल्या उमेदवाराने महावितराने जाहीर केलेल्या निवड यादीत आपल्या नावासमोरील परिमंडळ कार्यालयात जाऊन कागद पात्राची पडताळणी करायची आहे , महत्वाचे म्हणजे कागद पात्राची पडताळणी करण्यासाठी महावितराने फक्त दोन दिवस दिले आहेत , दिनांक ३० जानेवारी २०२५ व दिनांक ३१ जानेवारी २०२५ , वेळ सकाळी १० वाजता याची समधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी .
महावितरणचे एकूण परिमंडळ खालील प्रमाणे –
१) अमरावती
२)कल्याण
३) भांडुप
४)छ. संभाजी नगर
५) लातूर
६) गोंदिया
७) बारामती
८) कोल्हापूर
९) नांदेड
१०)नागपूर
११)जळगाव
१२) अकोला
१३) रत्नागिरी
१४) चंद्रपूर
१५)पुणे
१६) नाशिक
उमेदवारांनी परीक्षेचा अर्ज भरताना आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे तसेच आपला आर्जची कॉपी घेऊन जावे व वर दिलेल्या तारखेस वेळेत जाऊन आपले कागदपत्रांची पडताळणी करून आपले शासकीय नौकरीच्या स्वप्नाच्या अजून एक पाऊल जवळ जाऊन आपले स्वप्न पूर्ण करावे असेच म्हणणे योग्य असेल .
वर नमूद केलेल्या वेळेत न गेल्यास उमेदवार या निवड प्रक्रियेतून आपोआप बाहेर पडतील त्यामुळे सर्व उमेदवारांनी महावितराने दिलेल्या तारखेला व वेळेत जाणे अनिवार्य आहे .
जे उमेदवार कागदपत्रे पडताळणी अंति पात्र असतील त्यांना जुनिअर असिस्टंट अकाउंट या पदासाठी नियुक्ती लवकरात लवकर होईल व हे सदरील उमेदवार रुजू झाल्यापासून ३ वर्ष्या करता बदली करण्यास अपात्र असतील , व जुनिअर असिस्टंट या पदानंतर या उमेदवारांचे पुढचे प्रोमोशन हे Lower division clerk म्हणून होईल .
कागदपत्र पडताळणी साठी तसेच परीमंडळ ऑलोकेशन ची उमेदवारांची निवड यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
आपल्या हि माहिती आवडली असेल तर आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .