Maharashtra SSC Result 2025-पहा १० वी च्या निकालाची तारीख येथे

See the result date of  Maharashtra SSC Result 2025  here

SSC Result २०२५-
Maharashtra SSC Result 2025:महाराष्ट्र राज्यातील जवळ पास १६ लाख विद्यार्थ्यांना आम्ही सांगू इच्छितो कि या वर्षी दर वर्षी पेक्षा परीक्षा ह्या ९ ते १० दिवस अगोदर घेतल्या त्यामुळे या वर्षी निकाल सुद्धा लवकरच लागणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे .
मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र SSC बोर्ड परीक्षे साठी जवळपास १६ लक्ष विद्यार्थी बसले आहेत .या १६ लक्ष विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आता एकाच गोष्टीची काळजी लागली आहे कि यंदा चा १० वि चा निकाल मग कधी लागणार तर ह्याचे स्पष्ट संकेत SSC बोर्ड ने आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या प्रकटन मध्ये दिले आहेत .
महाराष्ट्र SSC बोर्ड परीक्षेचा निकाल या वर्षी १५ मे २०२५ पर्यंत जाहीर करण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र बोर्ड ने म्हटले आहे .


का SSC बोर्ड परीक्षेचा निकाल महत्वाचा आहे ?

१० वी परीक्षा व निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असल्याचे मानले जाते कारण ह्या नंतरच विद्यार्थ्यांना त्यांना कशात जास्त आवड आहे हे स्पष्ट होण्यास खूप मदत होते .
१० वी म्हणजेच SSC नंतर विद्यार्थ्यंना विज्ञान शाखेत पुढे शिक्षण घायचे कि कला किंवा वाणिज्य मध्ये शिकायचे हे स्पष्ट ठरवता येते .
म्हणजेच ११ वी व १२ वी ला science घायचे कि कॉमर्स घायचे अथवा आर्ट्स मध्ये शिकायचे हे निवडता येते व त्यावरूनच डॉक्टर व्हयचे इंजिनीयर व्हायचे , CA ,IAS ,IPS इत्यादी साठी १०वी नंतरच तयारी केल्यास लवकर यश मिळण्यास मदत होते हे नक्की .

२०२५ मध्ये १०वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ पासून १७ मार्च २०२५ या दरम्यान पार पडणार आहे व ह्या परीक्षे साठी १६ लक्ष विद्यार्थी बसले असून ही परीक्षा महाराष्ट्रातील जवळपास ५००० पेक्षा जास्त परीक्षा केंद्रावर घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली .

कधी लागणार १०वी चा निकाल-

आम्ही आपल्यास परत एकदा सांगू इच्छितो या वर्षी चा निकाल हा गेल्या वर्षी पेक्षा लवकर लागणार आहे कारण ह्या वर्षी १० वी ची परीक्षा ही १० दिवस अगोदर सुरु झाली , त्या मुळेच SSC बोर्ड या वर्षी चा निकाल हा १५ मे २०२५ च्या अगोदर लावणार असल्याचा मानस बोर्ड ने जाहीर केला आहे .
बोर्ड चे प्रकटन वाचण्यासाठी येथे जा .

 

SSC परीक्षेचे ऍडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे-

सदरील परीक्षेचे हॉल तिकीट हे शाळा प्रत्येक विद्यार्थ्यंना शाळेतच उपलब्ध करून देणार आहे (विद्यार्थ्यांना स्वतः डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही) , व त्या साठी कसलाही शुल्क शाळा घेणार नसल्याचे ही बोअर्डने स्पष्ट केले आहे .
जर कुणाचे हॉल तिकीट हरवले असल्यास सामन्धीत विध्यर्थ्यनी शाळेत जाऊन शिक्षाकडून हॉल तिकिटाची द्वितीय प्रत घ्यावी .

आम्ही आमच्या संपूर्ण टीम कडून आपल्या SSC परीक्षेसाठी व निकालासाठी आपल्याला ऑल द बेस्ट म्हणतो .

तुम्हाला आमची Maharashtra SSC Result 2025 ही माहिती आवडली असल्यास आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .

Leave a Comment