See detailed Information about Kurunda Maharashtra market,Stores,School,Hospitals etc
Kurunda Maharashtra:नमस्कार मित्रानो आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्र राज्यतील हिंगोली जिह्यातील एका गावाची माहिती ते गाव म्हणजे कुरुंदा .
तुम्ही म्हणाल कुरुंदा तर गाव आहे आणि असं काय आहे या गावात , हो तुमच्या या प्रश्नच उत्तर नक्कीच तुम्हाला इथेच मिळणार आहे . चला तर जाणून घेऊयात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावा विषयी माहिती .
या पूर्वी तुम्ही कुरुंदा गाव हे बातम्यां मध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल कारण येथे ढग फुटी सारखे मागच्या ८ वर्षात ३ ते ४ वेळा पाऊस झाला होता जून २०१६ मध्ये , जुलै २०२० ,जुलै २०२२ तसेच २०२४ मध्ये सुद्धा येथे पूर आला होता .
परंतु कुरुंदा फक्त ह्याच गोष्टी साठी महत्वाचं आहे का तर नाही , हे एक मोठं गाव असून महाराष्ट्रातील इतर बऱ्याच तालुक्या एवढा मोठं हे गाव आहे . हे गाव किती मोठं आहे ह्याचा अंदाज ह्या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो इथे सध्या जवळपास २१ शाळा आहेत .चला तर पाहुयात कुरुंदा Kurunda Maharashtra विषयी सविस्तर माहिती .
कुरुंदयात काय काय आहे –
या गावात शेतकऱयांचे मोठे मार्केट आहे म्हणजेच येथे बरेच आडात दुकान आहेत , खत बियाण्यांचे अनेक दुकाने आहेत , तसेच सोनार गल्ली आहे , अनेक कापड दुकान सुद्धा आहेत , किराणा मालाचे तर अनेक मोठे दुकाने येथे पाहावयास मिळतात .
येथे मराठी , उर्दू , इंग्लिश माध्यमांच्या शाळा आहेत . आरोग्याच्या सर्व सुविधा सुद्धा आहेत , या वरून तुम्हाला कळलं असेल कि येथे काय आहे.
व्यवसाय व उद्योग-
कुरुंदा व आजूबाजूच्या परिसरात शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून बहुसंख्या लोकसंख्या शेती करतात , येथील जमीन अत्यन्त सुपीक असून या भागात शेती मध्ये केळी, हळद , खायचे विड्याचे पानाच्या बाग , कापूस , ऊस इत्यादी पिके घेतली जातात .
शेती शिवाय कुरुंदा मध्ये अनेक शेतीवर अवलंबून असलेले व्यवसाय सुद्धा आहेत जसे कि आडत दुकाने , शेतीच्या अवजारांची तसेच बी बियाणे , खते या साठी अनेक दालने येथे पाहावयास मिळतात .
तसेच येथे शुद्ध सोने खरेदी साठी आजूबाजूच्या गावातून लोक येथे येतात .
कुरुंदा येथे कापड , किराणा , घरबांधणी साठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने , इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अँप्लिअन्स चे , स्टेशनरी , बुक्स स्टोअर्स , मोबाइलला खरेदी व दुरुस्ती इत्यादींची दुकाने पाहावयास मिळतात .
जाणून घेऊयात Kurunda Maharashtra येथील काही दालनांची माहिती .
१)वेंकटरामना क्लाथ स्टोअर्स
२)छत्रपती मेन्स वेअर
३)साईकृपा क्लाथ स्टोर
४)श्री साई ड्रेसेस
५)लक्समि साडी सेंटर
६)सिद्धेवार कॉलेक्शन
७) R N टेलर शॉप
८) सय्यद टेलर शॉप
९)संतोष ज्वेलर्स
१०)श्री साई ज्वेलर्स
११)बालाजी ज्वेलर्स
१२)ओम साई कृषी सेवा केंद्र
१३)शिवगंगा कृषी सेवा केंद्र
१४) सरस्वती ट्रेडर्स
१५) महालक्ष्मी बिकानेर स्वीट मार्ट
१६)श्री बालाजी बिकानेर शॉप
आरोग्य सुविधा व हॉस्पिटल्स-
१)प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा – हा शासकीय दवाखाना असून येथे आजुबाच्या जवळपास १० ते १२ गावातून रुग्ण येतात .
२)मोरया क्लिनिक कुरुंदा
३)संकेत हॉस्पिटल कुरुंदा
४) कुबडे डॉ दवाखाना
५)वनदरकृष्णा क्लिनिक कुरुंदा
शिक्षण व शाळा-
कुरुंदा (Kurunda Maharashtra)येथे एकूण २१ शाळा आहेत , त्यातील काही प्रसिद्ध शाळा येथे पाहुयात
१) नरहर कुरुंदकर माध्यमिक विद्यालय कुरुंदा
ही या भागातील खूप प्रसिद्ध अशी शाळा आहे , येथे मराठी व सेमी अश्या दोन माध्यमात ५ वि ते १०वी पर्यंत अत्यन्त चांगले व फ्री शिक्षण मिळते , येथील विद्यार्थी संपूर्ण महाराष्टात विविध पदावर आपणास पाहावयास मिळतात . येथे डोण वाडा , कुरुंद वाडी , दाभडी, वर्ताला,पिंप्राळा इत्यादी गावातून विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात .
२) जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कुरुंदा
ही या भागातील अत्यन्त जुनी शाळा असून ही शासकीय शाळा आहे .
३) जिल्हा परिषद गर्ल्स स्कूल कुरुंदा
ही मुलींसाठी शाळा आहे .
४)जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा कुरुंदा
ही कुरुंदा येथी उर्दू माध्यमात पाचवी पर्यंतची शाळा आहे .
कुरुंदा येथे लहान बाळा साठी एकूण ९ ते १० अंगणवाड्या आहेत .
कुरुंदा लोकसंख्या व इतर माहिती
२०११ च्या जनगणना नुसार कुरुंदा येथील लोकसंख्या ही जवळपास १२३०० एवढी होती व एकूण २२०० घरे होती , तसेच लिंगगुणोत्तर ९५४ होते म्हणजेच १००० पुरुषांच्या प्रमाणात ९५४ महिला होत्या व साक्षरता दर हा जवळपास ६८ टक्के एवढा होता .
सध्या कुरुंदयाची लोकसंख्या ही २०००० पेक्षा जास्त असल्याचे येथील नागरिक म्हणतात .
कुरुंदा येथील बँक-
१) स्टेट बँक ऑफ इंडिया कुरुंदा (State Bank of India Kurunda Maharashtra )
येथे स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा असून SBI kurunda IFSC Code SBIN0021723
२) महाराष्ट्र ग्रामीण बँक कुरुंदा
येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा सुद्धा आहे
Maharashtra gramin Bank kurunda IFSC Code MAHG0004222
इतर माहिती-
कुरुंदा हे बसमथ म्हणजेच वसमत पासून १३ किमी अंतरावर असून हिंगोली पासून ५५ किमी अंतरावर आहे .व नांदेड पासून ४२ किमी अंतरावर आहे .
बसमथ येथून कुरुंदा येथे येण्यासाठी MSRTC च्या बसेस उपलब्ध असतात त्या प्रत्येकी १ तासाला वसमत येथून सुटतात .
कुरुंदा येथे टोकाई देवीचे पवित्र मंदिर असून येथे दसऱ्याला व नौरात्री मध्ये भव्य यात्रा भरते .
कुरुंदा येथे प्रत्येक शनिवारी मोठा आठवडा बाजार भरतो व येथे आजूबाजूच्या सर्व गावातून लोक खरेदी साठी आवर्जून येतात .
kurunda pin code 431512 हा आहे तसेच येथे पोस्ट ऑफिस सुद्धा आहे .
तुम्हाला आम्ही दिलेली Kurunda Maharashtra ही माहिती आवडली असल्यास आमच्या website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .