see detailed information about Kharosa caves, its history, structure , characteristics and much more
Kharosa Caves:आपल्या महाराष्ट्रात लेणी म्हटलं कि डोळ्या समोर येत ते म्हणजेज दाट जंगलात एका मोठ्या अश्या दगडात कोरलेली गुफा ज्यात अत्यन्त शांतता तसेच थंडगार गारवा आणि दगडावर कोरलेल्या अत्यन्त सुंदर असं नक्षी काम केलेले शिल्पा कृती .
असेच सर्व वैशिष्ट्य असलेल्या लेण्या ह्या लातूर जिल्ह्यात सुद्धा आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलंत लातूर मधील खरोसा येथे अत्यन्त सुंदर अश्या प्राचीन लेण्या आहेत , ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना माहिती आहे .
खरोसा लेण्या ह्या एकूण १२ लेण्यांचा शृंखला आहे. चला तर म्ह पाहुयात Kharosa Caves म्हणजेच खरोसा लेण्यांबद्दल सविस्तर माहिती.
खरोसा लेण्यांचा इतिहास –
ह्या लेण्या चालुक्य साम्राज्यांच्या काळात म्हणजेच इसवीसण ६ व्या शतकात येथील लेण्या कोरण्यात आल्या असल्याच्या अनेक नोंदी आहेत .
येथील लेण्या ह्या खरोसा या गावातील डोंगरावर कोरल्या आहेत ,येथे एकूण १२ लेण्या असून प्रत्येक लेण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत .
१८१८ मध्ये ब्रिटिश अधिकारी व स्कॉटलंड चा जेम्स ग्रांट याने ह्या लेण्या जगासमोर आणल्या .
खरोसा येथील १२ लेण्यांची काही वैशिष्ट्ये –
पहिली लेणी – खरोसा येथील पहिल्या लेणी मध्ये भगवान बॊध्दांची पेन्टेड मूर्ती पाहावयास मिळते , ही अतिशय सुंदर , प्राचीन मूर्ती असल्याचे समजते .
दुसरी लेणी – येथे भगवान शंकराची शिवलिंग असून आतल्या रूम मध्ये हे भव्य शिवलिंग असून येथे अतिशय प्रसन्न व शांत वाटत .
तिसरी लेणी – ह्या लेणी मध्ये भगवान शंकराची नटराज च्या रूपात मूर्ती असून ती अतिशय सुंदर व बारीक कोरीव काम असलेली लेणी आहे .
चौथी व पाचवी लेणी -ह्या लेणी दोन मजली असून अतिशय सुंदर रचना करून ह्या दोन मजली लेण्या कोरल्या आहेत .
खरोसा येथील सर्वच लेण्या ह्या बेसाल्ट खडकामध्ये कोरल्या आहेत .नैसर्गिक पाण्याचा साठा हे सुद्धा येथील लेण्यांचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे .
वास्तुकला व स्थापत्य रचना-
येथील लेण्या ह्या एल्लोर व अंजिठ्या प्रमाणे रॉक कट प्रकारातील असून येथील लेण्यांमध्ये विहार आणि प्रार्थना हॉल दिसून येतात , येथील कोरलेले दगडी खांब हे चौकोनाकृती असून ते खूप मजबूत आहेत .
खरोसा लेण्या ह्या सपाट जमिनीपासून ३० ते ५० मीटर म्हणजेच १०० ते १६० फूट उंचीवर आहेत .
येथील सर्व मुख्य लेण्या ह्या १ ते १.५ वर्ग किमी एरिया मध्ये पसरलेल्या आहेत .
खरोसा लेण्यांना जाताना घ्यावयाची काळजी –
तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो कि खरोसा लेण्यां जवळ राहण्यासाठी कुठलंही हॉटेल किंवा खण्यसाठी नाश्ता सेंटर नाहीये तरी जाताना सोबत पुरेल एवढे प्यायचे पाणी , खाण्यासाठी काही तरी सोबत घ्यावे तसेच पायामधे शूज आणावे कारण येथे दाट झाडी व डोंगरावर दगडे व इतर कीटकांपासून धोका होणार नाही .
खरोसा लेण्या ना कसे यावे –
खरोसा लेण्या ह्या येथील डोंगराच्या पायथ्यशी असलेल्या खरोसा गावावरून १ किमी अंतरावर वसलेल्या असून . खरोसा लेण्या ह्या औसा निलंगा रोड वर आहे .
खरोसा हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असून लातूर पासून अवघ्या ४३ किमी अंतरावर आहे तसेच औसा पासून २५ किमी अंतरावर आहे .
येथे जाण्यासाठी लातूर वरून निलंगा जाणार्या MSRTC बस ने येथे येता येते . इथे येण्यासाठी लातूर वरून ४० मिनिटे तसेच औसा वरून २५ मिनिटे लागतात .बस चे अंदाजे तिकिट हे ७० रुपये एवढे असून लातूर वरून प्रत्येकी ३० मिनिटाला बस मिळते .
तुम्हाला आम्ही दिलेली Kharosa Caves ही माहिती आवडली असल्यास आमच्या Website वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .