See detailed Information about Ausa city
Ausa City:Ausa Maharashtra नमस्कार मित्रानो आज आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील अश्या एका शहराविषयी माहिती ज्या शहरासाठी विजापूरच्या आदिलशहा , औरंगजेबाचं मुघल तसेच हैदराबाद च निझाम या सर्वानी हे शहर मिळवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न केला .
ते शहर आहे लातूर जिल्यातील औसा , औसा चा इतिहास हा सुमारे ८०० वर्ष जुना आहे म्हणजेच १२ व्या शतकापासून औसा चा इतिहास पाहावयास मिळतो , सुरुवातीला औसा हे यादव साम्रज्याचा भाग होते नंतर विजापूरच्या आदिलशहा साम्राज्यात आले व भारत स्वतंत्र व्हायचा वेळेत औसा हे निझाम साम्राज्यचा भाग होते .
नंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापने नंतर औसा महाराष्ट्र राज्याचा भाग झाला .
औसा पूर्वी उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्याचा भाग होता नंतर ऑगस्ट १९८२ मध्ये धाराशिव जिल्याचे विभाजन होऊन लातूर नवीन जिल्हा झाला व औसा लातूर जिल्याचा भाग झाले .
औसा शहराची वैशिष्ट्ये –
१)औसा किल्ला हे औसा शहराचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे .
२)औसा MIDC – लातूर जिल्यातील लातूर नंतर सर्वात जास्त मॅनुफॅक्चरिंग कंपन्या असलेली इंडस्ट्रियल एरिया आहे .
३)बालाजी मंदिर औसा – औसा शहराला लागूनच १ किमी अंतरावर एक भव्य व सुंदर असे भगवान बालाजी चे मंदिर आहे , येथे भाविक खूप दूरवरून येतात .
४) औसा सोयाबीन मार्केट -औसा मध्ये खूप चांगल्या प्रतीचे सोयाबीन या नागडी पिकाचे उत्पन्न होते .
शेती-
औसा मधील ८० टक्के लोकसंख्या हे शेती हे आपला प्रमुख व्यवसाय म्हणून करतात .
येथे सोयाबीन हे मुख्य पीक घेतले जाते , त्या सोबतच येथे छोटा हरभरा हि घेतला जातो त्यानंतर येथे ऊस हे नागडी पीक हि घेतले जाते व थोड्या प्रमाणात गहू ज्वारी हे पिके सुद्धा घेतली जातात .
शिक्षण-
शाळा
१)मुक्तेश्वर विद्यालय औसा – हे शहरातील खूप प्रचलित शाळा असून येथील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यंकडे विषयच लक्ष देतात असे या परिसरात बोलले जाते .
२)NBS अझीम हाय स्कूल – ही औसा शहरातील खूप जुनी व पालकांना विश्वास असलेली शाळा आहे .
३)स्वामी विवेकानंद हायर सेकंडरी स्कूल औसा
४)पोदार इंटरनॅशनल स्कूल औसा – ही एक औसा शहरातील CBSE शाळा आहे .
कॉलेजेस
१)श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा – हे औसा शहरातील प्रसिद्ध कॉलेज असून येथे दर वर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेतात .येथे कला , विज्ञान ,व वाणिज्य शाखेत शिक्षण घेता येते .
या महाविद्यालयाची स्थपणा १९७१ साली झाली आहे .
२)आझाद कॉलेज औसा – येथे कला , विज्ञान ,व वाणिज्य शाखेत पोस्ट ग्रॅजुएशन पर्यंत शिक्षण मिळत , हे सुद्धा भरपूर जुनी संस्था असून सर्व सुविधा असलेली संस्था आहे जसे कि बस सेवा , कॅन्टीन ,ग्रंथालय इत्यादी .
इतर माहिती-
औसा येथे MSRTC चे बस स्टँड तसेच डेपो असून औसा येथून यवतमाळ , अमरावती ,अकोला , हैदराबाद , परभणी , नांदेड साठी रोज बसेस सुटतात .
औसा शहरातून नॅशनल हायवे ३६१ जो नागपूर ते तुळजापूर जाणारा औसा वरून जातो तसेच एक रास्ता हा राष्ट्रीय महामार्ग ६५ ला भिडतो जो सोलापूर हैदराबाद ला मिळतो .
औसा शहर हे लातूर पासून 21 किमी अंतरावर आहे तसेच तुळजाभवानी मंदिर तुळजापूर हे औसा पासून ५७ किमी अंतरावर आहे .
तुम्हाला आमची Ausa City ही माहिती आवडली असेल तर आमच्या WEBSITE वरील इतर माहिती नक्की वाचा धन्यवाद .